आधी हेल्मेट घाला म्हणून बोंबलला, आता स्वत:च मोडले नियम; स्पितीत सोनू सूदची बिना हेल्मेट राईड, VIDEO VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonu Sood Spiti Bike Ride : सोनू सूदचा स्पिती व्हॅलीमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसतो. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई : अभिनेता सोनू सूद नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांआधी सोनू सूदच्या बायकोचा भयंकर कार अपघात झाला होता. त्यानंतर अनेक दिवस सोनू सूद फार कुठे दिसला नव्हता. आता अचानक सोनूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
सोनू सूदचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा स्पिती व्हॅलीमधील आहे. या व्हिडिओमध्ये तो हेल्मेट किंवा कोणतेही संरक्षक गिअर न घालता मोटरसायकल चालवताना दिसतो. या प्रकारामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून पोलिसांनी चौकशीही सुरू केली आहे.
advertisement
शर्टलेस, शॉर्ट्समध्ये थंडीमध्ये प्रवास
व्हायरल व्हिडिओमध्ये सोनू सूद बर्फाच्छादित रस्त्यावर शर्टलेस, फक्त शॉर्ट्स आणि सनग्लासेसमध्ये दिसतो. व्हिडिओ एका स्थानिक इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. "ये स्पिती है… यहां सिर्फ असली लोग चलते हैं," असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हेल्मेटशिवाय बाईक राईडवर नेटकऱ्यांचा संताप
काही क्लिपमध्ये सोनू हेल्मेट घालूनही दिसतो. पण शर्टलेस आणि गिअरशिवाय बाईक चालवणं लोकांना खटकलं. अनेक युजर्सनी त्याला सोशल मीडियावर सुनावलं. एकाने लिहिलं, "सर तुम्ही नेहमी प्रेरणा देता. पण अशी चुकीची उदाहरणं देऊ नका." दुसऱ्याने लिहिलंय, "सेलिब्रिटी जर कायद्याचे उल्लंघन करत असतील तर तरुण पिढी काय शिकेल?" काहींनी तर थेट हिमाचल प्रशासनालाही टॅग करत विचारलं, "सेलिब्रिटी कायद्याच्या वर आहेत का?"
advertisement
So will @himachalpolice take any action on @SonuSood for riding naked without a helmet in Spiti? No protective gear, no clothes — for god knows what he is trying to promote. Are celebrities above the law?@splahhp #HimachalPradesh
pic.twitter.com/3XUDBYkXqN
— Nikhil saini (@iNikhilsaini) May 26, 2025
advertisement
लाहौल-स्पिती पोलिसांची चौकशी सुरू
या प्रकरणाची दखल लाहौल-स्पिती पोलिसांनी घेतली असून त्यांनी X (म्हणजेच ट्विटर) वर पोस्ट करून चौकशी सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी म्हटलं, "एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेता लाहौल-स्पितीमध्ये वाहतूक नियम तोडताना दिसतो. तो व्हिडिओ 2023 मधील असण्याची शक्यता आहे. सत्यता तपासण्यासाठी प्रकरण DYSP मुख्यालय, कायलांग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे."
advertisement
कायदेशीर कारवाई होणार
पोलिसांनी पुढे सांगितले, “गरज पडल्यास कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. सर्व नागरिक आणि पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि जबाबदारीने वागावे.”
सोनू सूदने यापूर्वी रस्ता सुरक्षा मोहिमेत भाग घेतला
सोनू सूद याने यापूर्वी अनेकदा रस्ता सुरक्षा मोहिमांमध्ये भाग घेऊन लोकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच त्याचं असं वागणं पाहून अनेकजण नाराज झाले आहेत. पर्यावरण कार्यकर्त्यांनीही स्पितीसारख्या संवेदनशील भागात अशा वागण्याचा निषेध केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 8:12 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी हेल्मेट घाला म्हणून बोंबलला, आता स्वत:च मोडले नियम; स्पितीत सोनू सूदची बिना हेल्मेट राईड, VIDEO VIRAL