Arjun Tendulkar : सचिनचा पोरगा बॉलिंगनंतर आता बॅटिंगमध्येही नडला, एकट्याने फॉलोऑन रोखला!

Last Updated:

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सचिनचा पोरगा बॉलिंगनंतर आता बॅटिंगमध्येही नडला, एकट्याने फॉलोऑन रोखला!
सचिनचा पोरगा बॉलिंगनंतर आता बॅटिंगमध्येही नडला, एकट्याने फॉलोऑन रोखला!
शिवमोगा : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गोव्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिवमोगामध्ये गोवा आणि कर्नाटक यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरू आहे, या सामन्यात कर्नाटकने मॅचवर पकड बनवली आहे. कर्नाटकने केलेल्या 371 रनला उत्तर देण्यासाठी आलेल्या गोव्याने 171 रनवर 6 विकेट गमावल्या आहेत. अर्जुन तेंडुलकरने गोव्याचा फॉलोऑन वाचवला आहे.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्जुन तेंडुलकर नाबाद 43 रनवर खेळत होता, तर मोहित रेडकर 24 रनवर अर्जुनला साथ गेत आहे. अर्जुनने 115 बॉलमध्ये 5 फोर आणि एक सिक्स मारली आहे. अर्जुन आणि मोहित यांच्यात सातव्या विकेटसाठी 56 रनची पार्टनरशीप झाली आहे. अर्जुन आणि मोहित क्रीजवर आले तेव्हा गोव्याने 6 विकेट गमावून 115 रन केल्या होत्या, त्यामुळे टीमवर फॉलोऑनचं संकट ओढावलं होतं. पण अर्जुन तेंडुलकरने टीमला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढलं.
advertisement

बॉलिंगमध्ये घेतल्या 3 विकेट

त्याआधी अर्जुनने बॉलिंगमध्येही चमक दाखवली. 29 ओव्हरमध्ये 100 रन देऊन त्याने 3 विकेट घेतल्या. कर्नाटकचा ओपनर निकिन जोसे याला फक्त 3 रनवर अर्जुनने आऊट केलं. यानतंर त्याने कृष्णन श्रीजीत आणि अभिनव मनोहरचीही विकेट घेतली.

पृथ्वी शॉचं द्विशतक

दुसरीकडे चंडीगडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचा पृथ्वी शॉ 222 रनवर नाबाद खेळत आहे. पृथ्वीने त्याच्या या इनिंगमध्ये 156 बॉल बॅटिंग केली आणि 29 फोर, 5 सिक्स मारल्या. पृथ्वीच्या या खेळीमुळे महाराष्ट्र या सामन्यात मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चंडीगडला शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 335 रनची गरज असून त्यांच्या हातात 9 विकेट आहेत.
advertisement

रहाणेची शतकी खेळी

छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आहे. रहाणेने 303 बॉलमध्ये 159 रन केले, ज्यात 21 फोरचा समावेश होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : सचिनचा पोरगा बॉलिंगनंतर आता बॅटिंगमध्येही नडला, एकट्याने फॉलोऑन रोखला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement