शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे. इतके सुंदर गाणं आहे की आजही लोक त्याचा अर्थ न कळता गुणगुणत राहतात. अर्थ कळत नसला तरी त्यातील हृदयस्पर्शी भावना त्यांना जाणवतात. पण त्याचा अर्थ अधिक सुंदर आहे, जो केवळ साहित्य आणि भाषेचे जाणकारच नीट समजू शकतात.
'जिहाल-ए-मिस्किन' हे गाणे महान कवी अमीर खुसरो यांच्या एका सुंदर कवितेशी संबंधित आहे. ज्यांच्या लेखनावर गीतकार गुलजार यांचाही प्रभाव होता. अमीर खुसरोने बृजभाषा आणि पर्शियन यांचे मिश्रण करून कविता लिहिली आहेत.
advertisement
‘ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल,
दुराये नैना बनाये बतियां
कि ताब-ए-हिजरां नदारम ऐ जान
न लेहो काहे लगाये छतियां’
अमीर खुसरोच्या सुंदर रचनेचा अर्थ असा आहे की - 'बसून, डोळे मिटून माझ्या असहायतेकडे ( बेबसी) दुर्लक्ष करू नका. मी विरहाच्या (जुदाई ) भावनेने मरत आहे. तू मला छातीशी का मिठी मारत नाहीस?' या रचनेतून प्रेरित होऊन गीतकार गुलजार यांनी 'गुलामी' चित्रपटासाठी 'जिहाल-ए-मिस्किन' हे गाणे लिहिले आहे. त्या गाण्याच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन बरंजिश
बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है’
'गुलामी' चित्रपटातील गाण्याच्या या सुरुवातीच्या ओळींचा अर्थ बहुतेकांना माहित नसेल. ज्याचा अर्थ गाण्यापेक्षाही सुंदर आहे, 'माझ्या हृदयाची काळजी घे. त्यावर नाराज होऊ नको. माझ्या बिचाऱ्या हृदयाने विरहाचे दु:ख सहन केलं आहे.
लता मंगेशकरांच्या या गाण्याचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांप्रमाणेच कथाही दमदार होती. सिनेमातील हे गाणं मिथुन चक्रवर्ती आणि अनिता राज यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त सिनेमात धर्मेंद्र, नसीरुद्दीन शाह, अनिता राज, रीना रॉय आणि स्मिता राज हे कलाकाराही प्रमुख भुमिकेत आहेत.