दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिलं आहे. एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने हा दावा केला आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला UK मध्ये मारण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीच्या मदतीने इंग्लंडमध्ये शो बुक करण्यास सुरुवात केली. या प्लानमध्ये लॉरेन्सने सलमानचा बॉडीगार्ड शेरा याच्याशीही चर्चा केली होती. पण लॉरेन्सने शेवटच्या क्षणी प्लान कॅन्सल केला आणि सलमानला पुन्हा फक्त धमकी दिली.
advertisement
पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीचा शॉकिंग खुलासा
भट्टी म्हणाला की, "लॉरेन्स मला म्हणाला की सलमानला UKला बोलावून टार्गेट करायचं आहे. त्यानंतर सलमानचा बॉडीगार्ड शेरासोबत बोलणं झालं. शेराने सलमान खानला UKला आणण्यासाठी बोलणं सुरू केलं. या दरम्यान माझ्या लोकांनी बुकिंग करण्यास सुरूवात केली. माझ्याकडे याचे वॉइस मेसेज देखील आहेत."
भट्टी पुढे म्हणाला, "सगळं प्लानिंग झालं होतं तेव्हा लॉरेन्सने त्याचा प्लान अचानक बदलला. त्याला फक्त धमकी द्या असं सांगितलं. त्याची हत्या केली तर मीडियापासून तो दूर होईल. हे ऐकल्यानंतर मी माझ्या माणसांना प्लानपासून मागे खेचलं." दरम्यान भट्टीने ही कोणत्या सालची गोष्ट आहे हे सांगितलेलं नाही.
शहजाद भट्टीच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्सला सलमानच्या नावाने प्रसिद्धी हवी होती, म्हणून त्याने त्याची हत्या करण्याऐवजी फक्त धमकी देण्याचा निर्णय घेतला. शहजाद भट्टीने असाही दावा केला की, सिद्धू मूसेवाला यांची 2022 मधील हत्या देखील प्रसिद्धीसाठीच करण्यात आली होती. हत्येनंतर लगेचच लॉरेन्स आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांच्या टोळीला प्रसिद्धी मिळाली. मात्र आता लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्यात मतभेद वाढले आहेत.
काळवीट शिकारीपासून सलमान टार्गेट
1998 मधील काळवीट शिकार प्रकरण हे सलमान खानला टार्गेट करण्यामागचं खरं कारण आहे. जोधपूरमध्ये हम साथ साथ हैं चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना सलमानवर काळवीट मारल्याचा आरोप झाला होता. बिश्नोई समाज काळवीट पवित्र मानतो, त्यामुळे या घटनेनंतर लॉरेन्सने सलमानला टार्गेट बनवलं.
5 April 2018 रोजी जोधपूर कोर्टाने सलमानला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती, मात्र तो जामिनावर सुटला. खटला अजून राजस्थान हायकोर्टात सुरू आहे. दरम्यान सात वर्षांआधी लॉरेन्सला अटक केली तेव्हा तो मीडियासमोर असं म्हणाला होता की, "मी सलमान खानला इथेच मारेन आणि सगळे फक्त बघत राहतील.