रितेशने भाषणात मांडलेले मुद्दे चांगलेच गाजले होते. त्याने धर्म या विषयावरून त्याने विरोधकांना चांगलंच फटकारलं होतं. इतकं करूनही धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमध्ये पराभव झाला. धीरज भैयासाठी रितेश देशमुख व्हिलन ठरला का?
( Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी )
निवडणूक प्रचाराच्या दिवसात धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. ज्यात अभिनेता रितेश देशमुखने हजेरी लावली होती. गोलमाल, लयभारी स्टाईलमध्ये रितेशने भाषण ठोकलं होतं.
advertisement
रितेश भाषणात काय काय म्हणाला?
अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणात पुढे म्हटले की, ''आज सगळे पक्ष म्हणतात की धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा.'' पण खरं तर ते धर्मालाच प्रार्थना करत आहेत की त्यांना या निवडणुकीत वाचवावे. धर्म प्रत्येकाला प्रिय आहे. धर्माचे आचरण प्रत्येक जण करतो. पण धर्माच्या नावाने बोलणाऱ्यांना विचारा आमच्या कामाचं काय झालं? "धर्माचे आम्ही पाहून घेतो, तुम्ही आमच्या पिकांच्या भावाचे सांगा, धर्माचे आम्ही पाहून घेतो तुम्ही आमच्या आया-बहिणींच्या सुरक्षितेचे सांगा" असे विचारा, असे आवाहन रितेशने आपल्या भाषणात केले. निवडणूक काळात बऱ्याचशा, भुलथापा येतील, अफवा येतील, गाफिल राहू नका असे आवाहनही रितेशने केले.
लातूर शहर विधानसभेची जागा लोकप्रिय जागांपैकी एक होती. अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ अमित देशमुख येथून निवडणूक लढवत आहे. अमित सध्या 8560 मतांनी पुढे आहेत. भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेवर रितेश देशमुखचा दुसरा भाऊ धीरज देशमुख पिछाडीवर आहे. येथे भाजपचे रमेश काशीराम कराड 1785 मतांनी पुढे आहेत.
