अभिजीत बिचुकले यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी खूपच उत्साही होते. मात्र त्यांचा उत्साह मावळ्याची चिन्हे दिसत आहेत. याआधी 2019 साली अभिजीत बिचुकले वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे होते. तिथे त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकांसाठी त्यांनी त्यांची मातृभूमी असलेला सातारा-जावळी मतदारसंघ निवडला होता. मात्र यावेळीही ते जिंकू शकतील अशी चिन्हे फार कमी दिसत आहेत.
advertisement
(Maharashtra Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 उमेदवारांची विजयी यादी
अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरले होते. सातारा आणि कल्याण-डोंबिवली अशा दोन मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. 2004, 2009, 2014 आणि आता 2024 अशी चार वर्ष अभिजीत बिचुकले यांनी निवडणुक लढवली मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश आलेलं नाही.
अभिजीत बिचुकले काही महिन्यांआधीच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सगभागी झाले होते. या सीझनमध्ये त्यांनी एका एपिसोडसाठी एंट्री घेतली होती. मात्र तो एपिसोड ते गाजवून गेले होते. मी निवडणुकीला उभा राहणार आणि जिंकून येणार असंही त्यांनी बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं.
