आषाढी एकादशीच्या दिवशी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. "महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे", असं म्हणत मांजरेकरांनी या चित्रपाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या मराठी चित्रपटाचा दबदबा असणार होता.
advertisement
'15-17 वर्ष मुंबईत राहता, लाज वाटली पाहिजे...' मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय झालं?
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' कधी प्रदर्शित होणार?
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली असून आता हा बहुप्रतिक्षित चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात मराठी मालिकाविश्वासह बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थने महाराजांची भूमिका साकरली आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात बालकलाकार त्रिशा ठोसरदेखील केंद्रस्थानी असणार आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. गणपतीत या चित्रपटातील 'दुर्गे दुर्घट भारी' या गाण्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. एकंदरीतच 2026 च्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर चांगलाच धमाका करणार आहेत. महेश मांजरेकरांचा आगामी 'दशावतार' हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत दिलीप प्रभावळकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.