गीतकार वैभव जोशी अनेक वर्ष त्यांच्या कवितांचे कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांच्या 'सोबतीचा करार' या कार्यक्रमाला प्रेक्षक विशेष गर्दी करतात. त्यांच्या कार्यक्रमांना तरुण मंडळी देखील हजेरी लावतात. तरुण मंडळी देखील वैभव जोशी यांचे फॅन्स आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बॅकस्टेजला रांग लागते. तुम्हाला माहिती आहे का, वैभव जोशी चाहत्यांना त्यांची सही तर देतात पण अनेकदा ते त्यांचा नंबर देखील लिहून देतात आणि घरी पोहोचल्यानंतर कळवा असं सांगतात. ऐकून शॉक बसला का? पण हो वैभव जोशी असं करतात. ते असं का करतात हे देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
( 'मुंबईत राहतोस मराठी येत नाही', जेव्हा अभिनेत्रीनं घेतली कपिल शर्माची चांगलीच शाळा, VIDEO )
मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वैभव जोशी यांनी सांगितलं, "12.30 ला कार्यक्रम संपला आहे. पार्ल्यात कार्यक्रम संपला आहे उदाहरणार्थ किंवा शिवाजी मंदिरला. असं अनेकदा होतं की, मुली येतात आणि सर सही द्या ना म्हणतात. मी सही करता करता त्यांना विचारतो, काय बाळा नाव तुझं. कुठून आलीस? मग ती सांगते सर डोंबिवली." हे ऐकून वैभव जोशी शॉक होतात.
वैभव जोशी पुढे म्हणाले, "हे एकूण मी त्यांनी म्हणतो, काय? अग साडेबारा वाजलेत. नाही सर आम्ही जाऊ. अग शेवटची लोकल साडे अकरा वाजताची होती. मग त्या सांगतात, नाही सर आम्ही मध्ये कोणाच्या तर घरी थांबणार आहोत. किंवा आम्ही उबर करू, तुम्ही नका काळजी करू."
वैभव जोशी यांनी सांगितलं, "मग अशा वेळी मी तिथे खाली माझा नंबर लिहितो. पोहोचल्यावर व्हॉट्स एप कर किंवा इन्स्टाला DM करायला सांगतो, मग ओळख असूदेत किंवा नसूदेत. असं सगळ्यांच्या बाबतीत होतंय. हे जरा जास्त होतं पण आता काय करणार." वैभव जोशी यांच्या या कृतीतून त्यांचं चाहत्यांवर असलेलं प्रेम आणि काळजी दिसून येते.