TRENDING:

Actor Ravindra Berde : अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated:

रवींद्र बेर्डे यांच्यावर उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 13 डिसेंबर : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. आपल्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. रवींद्र बेर्डे यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईत टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.
News18
News18
advertisement

रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ होते. रवींद्र बेर्डे यांच्यावर उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घराला आग; एकजण किरकोळ जखमी

रवींद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नभोवाणीसह नाट्यसृष्टीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊदे, हमाल दे धमा, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेल्या या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.

advertisement

रवींद्र बेर्डे यांनी १९६५ मध्ये नाट्यसृष्टीत पाऊल टाकलं. तर चित्रपटसृष्टीत ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि ५ हिंदी चित्रपटांतही झळकले. १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या दहा ते १२ वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Actor Ravindra Berde : अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल