प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घराला आग; एकजण किरकोळ जखमी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अग्निशमनदलाच्या कर्मचारी वेळेत पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीच नेमकं कारण समोर आलं आहे.
मुंबई, 12 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीतून एक महत्त्वाचा माहिती समोर आली आहे. हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागली आहे. अहमदनगर येथे सदाशिव अमरापूरकर यांचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. सुनंदा सदाशिव अमरापूरकर असं त्यांच्या फ्लॅटचं नाव आहे. फ्लॅटला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमनदलाच्या कर्मचारी वेळेत पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. स्वर्गीय अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या फ्लॅटला शॉट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. फ्लॅट सुनंदा सदाशिव अमरापुर यांच्या नावाने असलेल्या या फ्लॅटमध्ये एक भाडेकरू राहत होत्या. ज्योती भोर पठाणे असं त्या भाडेकरूचं नाव आहे. आगीत ज्योती भोर पठाणे या भाडेकरू किरकोळ जखमी झाल्या आहेत. ज्योती या फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमनदलाच्या दवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
advertisement
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुनंदा सदाशिव अमरापुर या फ्लॅटला आज ( मंगळवार ) दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. त्यामुळे पहिल्या मजल्यावर ज्योती भोर पठाणे या अडकल्या होत्या. त्यांना वाचवण्यात आलं असून त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्यानं त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
advertisement
दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या दमदार खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे अनेक सिनेमे आजही तितक्यात आवडीनं पाहिले जातात. 2014साली सदाशिव अमरापूरकर यांचं वयाच्या 64व्या वर्षी निधन झालं. त्यांना फुफ्फुसासंबंधी आजार झाला होता. 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2023 3:22 PM IST