अभिनेते सुनील बर्वे 11 वर्षांनी पुन्हा झी मराठीवर पुनरगामन केलं. ते लोकप्रिय मालिका 'पारु' मधून हटके लूक आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ते या मालिकेत अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची भूमिका साकारत आहेत.
Bigg Boss Marathi 5: कोण करणार घात? पॅडी आणि DP च्या चर्चेनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO
advertisement
या निमित्ताने सुनील यांनी झी मराठी सोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती कारण झी मराठी मालिका विश्वातला पायनियर आहे आणि मी झी मराठी बरोबर एकदिलाने 2012 पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली तेव्हा पासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे.'
'सयाजीरावच्या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा सयाजीरावचा प्रोमो आला तेव्हा खूप जण म्हणत होते की नरसिंहराव परत आला. प्रेक्षकांना अजूनही माझी 11 वर्षापूर्वीची 'कुंकू' मालिका लक्षात आहे. मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे. मला जेव्हा 'पारू' मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे याचा आनंद झाला. प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे', असंही सुनील यांनी म्हटलं.