Vidyadhar Joshi : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकतचं एका मुलाखतीत कबुतर खान्याच्या वादावर आणि त्यांना झालेल्या फुफ्फुसाच्या आजाराबाबत आपलं मत मांडलं आहे. फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर विद्याधर जोशी यांनी 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण केलंय. जीवघेण्या आजारावर यशस्वीपणे मात केल्यानंतर शहरातील कबुतरखाने हे फुफ्फुसाच्या आजारासाठी निमंत्रण आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच कबुतर खान्याच्या मुद्द्यावरुन राजकारणात वाद निर्माण झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. आता यावर अभिनेते विद्याधर जोशी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं फुफ्फुस कमजोर : विद्याधर जोशी
दादरचा जो कबुतरखाना आहे त्याच्यावरुन दोन्हीबाजूने वाद, आंदोलने सुरू होती. कबुतरांमध्ये काय त्रास होतो याबाबत अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी म्हणाले,"कबुतर किंवा कबुतर खान्यांमुळे फुफ्फुसाचा खूप मोठा रोग होऊ शकतो. सगळ्यांनाच माझ्याएवढा मोठा होईल अशातला भाग नाही. आज मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं फुफ्फुस हे काही प्रमाणात कमजोरचं आहे हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. मला एक गोष्ट कळत नाही की, तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टीमुळे संपूर्ण समाजाला त्रास होणार आहे".
पुण्याचा सारंग साठ्ये झाला कॅनडाचा जावई डीप कोव्हच्या किनारी असा पार पडला लग्नसोहळा, PHOTO
विद्याधर जोशी पुढे म्हणाले,"यात जात, धर्म, पंथ, लिंग, तुमचा पेशा, आर्थिक बाजू काहीही येत नाही. सगळ्यांना त्रास होणार आहे. तरी तुम्ही त्याला कसा पाठिंबा देता? डोक्यावर पडले आहेत का ही माणसं? अशावेळी मी भयंकर असवस्थ होतो. तुम्हाला कळू नये का? तुम्ही कशाच्या मागे लागला आहात? सगळ्याची समाजाची तुम्ही वाट लावताय. मोठमोठ्या डॉक्टरांचंही तुम्ही ऐकत नाही. नॅशनल पार्कमध्ये कबुतर खाना हलवण्यात येणार असं ऐकलं. सध्याची विकासाची एकंदरीत गती पाहता उद्या शहर नॅशनल पार्कमध्ये जाईल".
कोण आहेत विद्याधर जोशी?
विद्याधर जोशी यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातही ते सहभागी झाले होते. 'शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. गेले काही दिवस गंभीर आजारामुळे ते मनोरंजनसृ्ष्टीपासून दूर होते. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. 'बाप्पा' या नावाने ते इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत.