शिवसेना नेत्याच्या मुलासोबत जुळले सूत
तेजस्विनी लोणारी ही शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची सून होणार आहे. तेजस्विनीचा साखरपुडा सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी झाला आहे. समाधान सरवणकर हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.
advertisement
तेजस्विनीच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होत असे, पण तिने कधीही याबाबत उघडपणे भाष्य केले नव्हते. अखेर तिने थेट साखरपुडा उरकून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आता लग्नानंतर तेजस्विनी एका प्रतिष्ठित राजकीय घराण्याची सून म्हणून नवी भूमिका साकारणार आहे. सदा सरवणकर यांनी माहीम मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
समाधान सरवणकरांची तेजस्विनीसाठी सुंदर पोस्ट
समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोबतच, त्यांनी एक भावूक कॅप्शन लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाधान यांनी लिहिले आहे, "एक नवीन सुरुवात, एक नवं आयुष्य देणारा हा क्षण, भावनांच्या ओघात गुंफलेला हा सुंदर प्रवास, जेव्हा 'मी' आणि 'तू' म्हणत चाललो होतो, आज 'आपण' झालो, आणि कायमचे एक झालो… हा क्षण म्हणजे... आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या प्रेमाची सुरूवात!"
चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
साखरपुड्यासाठी तेजस्विनी लोणारीने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. हातात हिरवा चुडा आणि तिच्या चेहऱ्यावर असलेला निर्मळ आनंद स्पष्ट दिसत होता. या दोघांची भेट कशी झाली, हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, अभिनेत्री आणि राजकारणी कुटुंबाचे हे अनोखे समीकरण पाहून चाहते त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
