चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच ‘सकाळ तर होऊ द्या’ ची चर्चा आहे. दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीतून मराठीत पदार्पण केलं आहे. निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी ‘श्रेय पिक्चर कंपनी’ अंतर्गत याची निर्मिती केली आहे.
advertisement
ट्रेलरमध्ये सुबोध भावे आणि मानसी नाईकची केमिस्ट्री खूप छान दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सुबोधची व्यक्तिरेखा एका एकांतप्रिय आणि समाजापासून अलिप्त राहिलेल्या नायकाची असल्याचं दिसतं. तो त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधत आहे.
अजब मागणी आणि रहस्य!
या गूढ नायकाच्या आयुष्यात नियती नावाच्या नायिकेची एंट्री होते. मानसी नाईकने साकारलेली ‘नियती’ या नायकाच्या मनात दडलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. पण, नायक तिला एक असं काम करायला सांगतो, जे ऐकून तिला धक्का बसतो! तो अशी मागणी का करतो? नियती ते काम स्वीकारणार का? आणि नायकाचा हा एकांतवास अचानक का सुरू झाला, या सगळ्या कोड्यांची उकल ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट पाहिल्यावरच होणार आहे.
सुबोधचा आजवर कधीही न पाहिलेला लूक आणि मानसीने साकारलेली कुतूहल वाढवणारी नियती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. ‘नाच मोरा...’ आणि ‘जगू दे मला...’ या रोहित राऊतने संगीतबद्ध केलेल्या श्रवणीय गाण्यांमुळे ट्रेलर अधिकच प्रभावी झाला आहे.