अनुष्का शर्माचं करिअर सुरू होण्याआधीच संपलं असतं, करण जोहरने लावली होती फुल्ल फिल्डींग, नेमकं काय झालं होतं?

Last Updated:
Anushka Sharma-Karan Johar : आज अनुष्का शर्मा आघाडीची सुपरस्टार असली, तरी एकेकाळी बॉलिवूडमधील एका बड्या दिग्दर्शकाने तिचे फोटो पाहून थेट तिला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता!
1/6
मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपले स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करतात, कारण इथे गॉडफादर असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. हीच गोष्ट अभिनेत्री अनुष्का शर्माच्याही बाबतीत खरी ठरली.

advertisement
2/6
आज ती आघाडीची सुपरस्टार असली, तरी एकेकाळी बॉलिवूडमधील एका बड्या दिग्दर्शकाने तिचे फोटो पाहून थेट तिला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता! हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून, खुद्द करण जोहर आहे.

3/6
अनुष्का शर्माने २००८ मध्ये शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा होते. तेव्हा करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यात झालेल्या एका संभाषणाचा खुलासा खुद्द करणनेच एका इव्हेंटमध्ये केला होता.

4/6
करण म्हणाला, “जेव्हा आदित्य चोप्राने मला अनुष्काचे काही फोटो दाखवले, तेव्हा मी लगेच त्याला नकार दिला. माझं पहिलं रिएक्शन होतं, ‘नाही, नाही! तू वेडा झाला आहेस का? तू हिला साईन करत आहेस? या अनुष्का शर्माला साईन करण्याची काहीच गरज नाहीये!’” करणच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतं की, त्याने अनुष्काला ‘हिरोईन मटेरियल’ मानलं नव्हतं.

5/6
करण जोहरने नकार देऊनही आदित्य चोप्राने मात्र अनुष्कावर विश्वास ठेवला. ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अनुष्काने एका झटक्यात करण जोहरला चुकीचं ठरवलं!

6/6
पुढे जाऊन करण जोहरलाही आपली चूक लक्षात आली आणि त्याने अनुष्काला आपल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात साइन केलं, ज्यात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांसारखे मोठे स्टार्स होते. आज अनुष्का शर्मा केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर एक निर्माती म्हणूनही ओळखली जाते.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement