मालिकांचं शुटींग हे सलग सुरू असतं. महिन्यातील जवळपास 25 दिवस कलाकार मालिकांचं शुटींग करत असतात. त्यांना फारशा सुट्ट्या मिळत नाहीत. पण या सगळ्या कलाकारांना आणि त्याबरोबर मालिकेत पडद्यामागे काम करणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञांना ब्रेक मिळणार आहे. हा ब्रेक मतदानासाठी असणार आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मालिकेतील कलाकारा, तंत्रज्ञ आणि अन्य लोकांना एक दिवसाची शुट्टी देण्यात आली आहे.
advertisement
मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई
अनेक मालिकांचं शुटींग हे मुंबईबाहेर सुरू आहे. त्यामुळे त्यांना मतदानासाठी आपल्या आपल्या शहरात पाठवण्यासाठी आलं आहे. तर काही मालिकांचे शुटींग हे मुंबईत आहेत. त्या मालिकेची टीम मतदान करून दुपार नंतर शुटींग करणार आहेत.
'थोडं तुझं आणि थोडं माझं', 'येड लागलं प्रेमाचं', 'उदे गं अंबे', 'अबोली', 'जय जय स्वामी समर्थ', 'इंद्रायणी', 'पिंगा गं पोरी', 'अप्पी आमची कलेक्टर', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'नवरी मिळे हिटरला' अशा काही मालिकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर 'गाथा नवनाथांची', 'लाखात एक आमचा दादा', 'शिवा', 'सावळ्यांची जणू सावली' या मालिकांचं चित्रीकरण दुपारनंतर होणार आहे. तर गाथा नवनाथांची' या मालिकेचं शुटींग सकाळी 7-8 वाजल्यापासून सुरू होतं. पण मतदानाच्या दिवशी चित्रीकरणाचा 'कॉल टाइम' 11 वाजताचा ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे असतं. मालिकेतले सगळेच कलाकार- तंत्रज्ञ नाशिकचे नाहीत. त्यामुळे मतदान करण्यासाठी त्यांना आपापल्या शहरात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत शुटींग करणारे बरेचसे कलाकार मुंबईबाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांनाही मतदानाच्या दिवशी एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
Gulabi Movie: मराठी सिनेमानं रचला इतिहास! रिलीजच्या आधीच केली कोटींची कमाई