'मुळशी पॅटर्न' मधील चहावाली म्हणजेच अभिनेत्री मालविका गायकवाड. तिची ही भूमिका आणि पहिलाच सिनेमा होता. या एकाच सिनेमाने दिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता ती ती पदवीधर झाली असून चर्चेत आली. तिने चक्क इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
advertisement
मालविकाचं बालपण पुण्यात गेलं. सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअर झाली. अभिनयाची आवड असल्याने तिने 'मुळशी पॅटर्न'साठी ऑडिशन दिली आणि तिच्या साध्या पण प्रभावी भूमिकेसाठी तिची निवड झाली. हा तिचा पहिलाच चित्रपट होता आणि यानंतर ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसली नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? मालविका ही सामान्य मुलगी नसून, ती बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची कन्या आहे! तिच्या या रॉयल पार्श्वभूमीबद्दल फार कमी लोकांना माहिती होती.
मालविकाने 2020 साली सिद्धार्थ सिंघवीशी लग्न करत ती पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाली. तिने केवळ शिक्षणच पूर्ण केले नाही, तर व्यवसाय क्षेत्रातही तिने स्वतःला सिद्ध केले. सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तिने मित्रांच्या मदतीने 'द ऑरगॅनिक कार्बन' नावाची यशस्वी कंपनी सुरू केली. याशिवाय, 'हंपी A2' या ब्रँड नावाने तिने दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरू केली आणि अल्पावधीतच या व्यवसायातही तिने खूप नाव कमावले.
दरम्यान, 'मुळशी पॅटर्न'मधील एका साध्या चहावालीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली मालविका गायकवाड, आता ऑक्सफर्डची पदवीधर आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायाची मालकीण आहे.