सूरज म्हणाला, "माझे आजोबा खूप मोठे पैलवान होते. गावामध्ये कोणी त्यांचा नाद नाही करायचे. बाकीचे पैलवान आजोबांचा पाय हलवण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांचा पाय अजिबात हलायचा नाही. बाकी सगळे दमायचे मग आजोबा त्यांना धरून खाली जमिनीवर पाडायचे. आजोबा एकटे पाच गावांवर भारी पडायचे. गावकऱ्यांनी पैलवान चांगला आहे म्हणून माझ्या आजोबांसाठी एक म्हैस बक्षीस म्हणून दिली होती."
advertisement
Bigg Boss Marathi 5: निक्की तू अभिजीतला भरवू शकतेस, बिग बॉस घेतायेत फिरकी; पाहा मजेशीर VIDEO
सूरज पॅडी दादालाही त्यांच्या गावाकडच्या गोष्टी विचारताना दिसत आहे. सुरज भाऊंना म्हणाला, "तुम्ही कोकणात राहता ना? मग तुम्ही गावी जाता का? तुमची शेती आहे तर तुम्ही कोणते पीक लावले आहे?" त्यावर पॅडी भाऊ म्हणाले, "आमची 1 एकर शेती आहे. पण आमचं गावी जास्त जाणं होत नाही. मुंबईत सगळे काम असल्यामुळे गावी जाणे जमत नाही आणि मुंबईत आम्ही वाढलो असून शहराची सवय झाली आहे. आम्हाला गावाची ओढ आहे पण जाणे होत नाही."
यावर सूरज म्हणाला, "तुम्ही कधी ना कधी गावी जात असाल. गाव सोडून कोणाला राहायला जमते? मला अजिबात गाव सोडून कुठेही राहायला जमत नाही."