सचिन पिळगावकर यांनी 'नवरा माझा नवसाचा 2'च्या सक्सेस पार्टीमध्ये चांगलाच कल्ला केला. सिनेमाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. पार्टीमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये सचिन पिळगावकर त्याच्या 35 वर्ष जुन्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. गाणं जरी 35 वर्ष जुनं असलं तरी सचिन पिळगावकर यांचा उत्साह मात्र तोच आहे.
advertisement
( Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा नऊवारीतला ठसका पाहून पैलवान चितपट, थेट घातली लग्नाची मागणी )
35 वर्षांआधी आलेला सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 'अशी ही बनवा बनवी' या कल्ट सिनेमातील 'हृदयी वसंत फुलताना' हे अजरामर आहे. 'नवरा माझा नवसाचा 2'च्या सक्सेस पार्टीमध्ये सचिन पिळगावकर यांचा गाण्यावर हटके डान्स करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह सिनेमातील कलाकार 'हृदयी वसंत फुलताना' या गाण्यावर डान्स करत आहेत. सचिन पिळगावकर यांच्यात तोच 35 वर्षांआधीचा उत्साह पाहायला मिळतोय. वयाच्या 67 व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साहापुढे तरुण कलाकारही फिके पडल्याचं पाहायला मिळतंय.