नेहा धुपियाने अँटी-इंफ्लेमेटरी चॅलेंज स्वीकारलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने महिलांचे आयोग्य, पोषण आणि जीवनशैलीतील बदल याबाबत भाष्य केलं आहे.
नेहा आपल्या 21 दिवसांच्या चॅलेंजमध्ये डायटिशिएन ऋचा गांगानीच्या सल्ल्यानुसार एक खास घरगुती काढा पिते.
advertisement
हळद, आलं आणि काळीमिरी या पदार्थांचा काढा नेहा दररोज न चुकता पिते. त्यामुळे तिच्या शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते.
नेहाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या 21 दिवसांच्या वेटलॉस चॅलेंजबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. तिने लिहिलं होतं,"21 दिवस, एक कमिटमेंट". तसेच हे चॅलेंज स्वीकारण्याबाबत तिने चाहत्यांनाही आवाहन केलं होतं.
नेहाने याआधी चाहत्यांसोबत ग्लूटेन फ्री डाएट शेअर केलं होतं. केळ्याचा पॅनकेक, फ्रेश बेरीज, फळांचा जाम या पदार्थांचा त्यावेळी नेहा आपल्या आहारात समावेश करत होती.
फिटनेसफ्रीक असणारी नेहा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण जूली, चुप चुपके आणि कयामत सारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.