‘बिग बॉस १९’ मध्ये सलमान खान वारंवार कुनिकाची बाजू घेतोय, असा आरोप प्रेक्षक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सलमानचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात तो शर्टलेस होऊन एका महिलेसोबत डान्स करत आहे. यावेळी ती महिला सलमानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. एखाद्या लाइव्ह कार्यक्रमात अशा प्रकारचा डान्स पाहणे थोडे अवघडल्यासारखे आहे. सलमाही त्या महिलेला अडवताना दिसत आहे. अखेर तो तिला खांद्यावर उचलून घेतलेला दिसत आहे.
advertisement
व्हिडिओतील महिलेचा चेहरा कुनिका सदानंदसारखाच दिसत असल्याने, अनेक लोकांनी अंदाज लावला की ती कुनिका आहे. अनेकांनी तर असंही म्हटलं की, या जुन्या मैत्रीमुळेच सलमान ‘बिग बॉस’मध्ये कुनिकाला सपोर्ट करतोय.
‘ती’ महिला कुनिका नाही, तर…
पण, आता हा गैरसमज दूर झाला आहे. सोशल मीडियावरील अनेक लोकांनी दावा केला आहे की, या व्हिडिओतील महिला कुनिका नसून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांची पत्नी पोनी वर्मा आहे. पोनीचं खरं नाव रश्मी वर्मा आहे आणि ती एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
सोशल मीडिया युजर्सने ‘एक्स’वर म्हटलं आहे की, “ती कुनिका नाही. ती लहानपणापासूनच थोडी जाड आहे आणि सलमानपेक्षा खूप उंच आहे. कुनिकाने तिच्या करिअरमध्ये फार कमी काम केलं आहे.”
पोनी वर्माने २००५ मधील ‘द डर्टी पिक्चर’, ‘भूल भुलैया’ आणि ‘टायगर जिंदा है’ सारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. तिने २०१० मध्ये प्रकाश राज यांच्यासोबत लग्न केलं.