मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नुपूरने दोघांची लव्ह स्टोरी सांगितली. नुपूर म्हणाला, "मी एक फिटनेस ट्रेनर आहे. रनर अॅट अॅथलिट. 2007 पासून मी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय. पर्सनल ट्रेनिंग करतो. फ्रिलान्सिंग करतो. 2013च्या आसपास मला आमिर खानला ट्रेन करायची संधी मिळाली. सहा महिने मी त्याला एका प्रोजेक्टमध्ये ट्रेन करत होतो. तो प्रोजेक्ट झाल्यानंतर पुन्हा माझं माझं काम सुरू झालं."
advertisement
( जीम ट्रेनरचं झाला जावई, मुलगी देण्याआधी मराठमोळ्या नुपूरला आमिरने विचारला होता तो एकच प्रश्न )
आमिरचा फिटनेस ट्रेनरमधून सुरू झाला प्रवास
नुपूरने पुढे सांगितलं, "2015मध्ये मला आमिर खानच्या ऑफिसमधून पुन्हा फोन आला. मला वाटलं की पुन्हा काही तरी प्रोजेक्ट असेल किंवा ट्रेनिंग असेल. तेव्हा भेटले आणि सांगितलं की माझ्या मुलीसाठी मी ट्रेनर बघतोय. मी 2015 पासून आयराला ट्रेन करतोय. 2015 ते 2020मध्ये ऑन अँड ऑफ तिची ट्रेनिंग सुरू होती. ती शिकायला गेली होती तेव्हा कधी कधी ऑनलाइन ट्रेनिंग व्हायची. ऑन अँड ऑफ होतं पण कॉन्स्टंट एक सुरू होतं."
आयरा आणि नुपूरची भेट
"2019-20च्या असपास आम्ही मित्र झालो. 2019च्या एंडला तिने एक प्ले केला होता. तेव्हा त्यांच्या कलाकारांना मी मदत करतो होतो. बॅकस्टेजला त्यांना मदत करत होतो. त्यावेळेस आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो, थोडे क्लोज आलो. त्यानंतर आम्ही डेटिंग सुरू केली. आमच्यात साडेबारा वर्षांचा फरक आहे. ती तिचं आयुष्य जगत होती मी माझं आयुष्य जगत होते. ती खूप ट्रिकी स्टेज होती. मी तिच्या वडिलांना ट्रेन करत होतो. एक प्रोफेशनलिझन, एक जबाबदारी असते. पण ऑरगॅनिकली गोष्टी झाल्यानंतर ठीक होतं."
लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन डेटिंग
नुपूरने सांगितलं, "2020मध्ये आम्ही डेट करायला लागलो. लॉकडाऊन झालं. ती तिच्या घरी, माझी आई आणि मी दादरच्या घरात होतो. त्यावेळेस ऑनलाइन डेट्स, ती तिच्या लॅपटॉपवर मी माझ्या लॅपटॉपवर, एकच मुव्ही, एकत्र सुरू करून रात्रभर बघणं, मग ती तिच्या घरी कॉफी, मी माझ्या घरी कॉफी अशा डेट्स आम्ही केल्या."
"पहिला लॉकडाऊन खूप स्ट्रिक्ट होता. त्याच्या 6-7 महिने आधी बाबा गेले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर त्यांनी सायकलिंग, रनिंग अलाउट केलं होतं. मग मी आयराला भेटायला धावत इकडे यायचो आणि धावत परत जायचो. सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्यानंतर आम्ही प्रॉपर डेटिंगला सुरूवात केली. त्यानंतर आम्हाला कळलं की हे सीरियस आहे."
लेकीच्या अफेअरवर आमिर खानची प्रतिक्रिया
आमिर खानचं काय म्हणणं होतं असं विचारल्यानंतर नुपूर हसत हसत म्हणाला की, "त्यांनीच मला तेव्हा सिलेक्ट केलं होतं. त्यांनी विचारलं की, बताओ भाई तुम लोगोका कैसे क्या हुआ? तेव्हा मीच मजेत म्हणालो होतो की, तुम्हीच म्हणालात." नुपूरने सांगितलं, "मी आयराच्या आईशी खूप क्लोज आहे. बाबा आहे. बाकीची फॅमिली, जुनैद. मी त्यांच्याबरोबर खूप कम्फर्ट फील करतो. त्यामुळे कधी काय वाटलं नाही. त्यांनाही पहिल्यापासून हे वाटलं होतं की हे सीरियस आहे."