TRENDING:

OTT Diwali Release : ओटीटीचा दिवाळी धमाका! मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन् बरचं काही... घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज

Last Updated:

OTT Release on Diwali : दिवाळीत ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. येत्या दिवाळीत अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
OTT Diwali Release : ओटीटीप्रेमींसाठी यंदाची दिवाळी (Diwali 2025) खूप खास असणार आहे. या दिवाळीत ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत कुठे फिरायला जाणार नसाल, घरी बसून कंटाळला असाल तर अजिबात टेंशन घेऊ नका. घरबसल्या ओटीटीवर अनेक दर्जेदार चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गेल्या काही दिवसांत थिएटरमध्येही अनेक उत्तम चित्रपट रिलीज झाले. यात 'दशावतार' या मराठी चित्रपटापासून 'कांतारा चॅप्टर 1'पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ओटीटीवरही ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पैसा वसूल करणारे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. यात कॉमेडी, हॉरर, रोमँटिक, थरार, नाट्य अशा विविध जॉनरचा समावेश आहे. अशातच येत्या दिवाळीत आणखी काही चित्रपट आणि सीरिज रिलीज होत आहेत. जाणून घ्या दिवाळीत कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय रिलीज होत आहे...
News18
News18
advertisement

परम सुंदरी :

जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट 29 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता थिएटर रिलीजच्या दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 24 ऑक्टोबरला हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. या चित्रपटाला सिनेसमिक्षकांचे चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. रोमँटिक लव्ह स्टोरी पसंत असणाऱ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल.

advertisement

Zee5 वर मस्ट वॉच आहे 'ही' 2 तास 9 मिनिटांची फिल्म, OTT वर गाजतेय साऊथची हॉरर कॉमेडी

द गेम: यू नेवर प्ले अलोन :

'द गेम: यू नेवर प्ले अलोन' हा चित्रपट 2 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही जर आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नसेल तर या दिवाळीत नक्की पाहा.

advertisement

मिराज :

'मिराज' हा एक मल्याळम मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. थिएटरमध्ये ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही ते या दिवाळीत पाहू शकतात. 23 ऑक्टोबरला सोनी लिव्हवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे.

सर्च : द नैना मर्डर केस :

'सर्च : द नैना मर्डर केस' ही वेब सीरिज 10 ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये कोंकना सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहे. क्राइम थ्रिलरची तुम्हाला आवड असेल तर हा चित्रपट पाहाच.

advertisement

वॉर 2 :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'वॉर 2' हा चित्रपट 9 ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता ओटीटीबाबत अपेक्षा आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Diwali Release : ओटीटीचा दिवाळी धमाका! मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन् बरचं काही... घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल