Zee5 वर मस्ट वॉच आहे 'ही' 2 तास 9 मिनिटांची फिल्म, OTT वर गाजतेय साऊथची हॉरर कॉमेडी

Last Updated:

OTT Horror Comedy Movie : Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील साऊथचा हॉरर कॉमेडी चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. रेटिंगच्या बाबतीतही हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकतो.

News18
News18
Top Rated Horror Comedy Movie On OTT: साऊथची एक हॉरर कॉमेडी सध्या ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाची कथा आणि पात्रं इतकी जबरदस्त आहेत की रेटिंगच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठ्या सिनेमांना मागे टाकले आहे. ‘स्त्री 2’ देखील यासमोर फिकी वाटते. काही चित्रपट असे असतात की ज्यांच्याबाबतीत फारसा गाजावाजा नसतो किंवा त्यांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नसते. पण रेटिंगच्या बाबतीत ते ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकतात. असाच एक चित्रपट गेल्या ऑगस्ट महिन्यात रिलीज झाला होता आणि सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. जर तुम्ही हॉरर कॉमेडीचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे. या चित्रपटाची कथा आणि पात्रं इतकी प्रभावी आहेत की IMDb ने या चित्रपटाला 8 रेटिंग दिली आहे. या साऊथच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचं नाव 'हाउसमेट्स' (House Mates) असं आहे.
ओटीटीवर घालतोय धुमाकूळ
टी. राजा वेल दिग्दर्शित 'हाउसमेट्स' हा 2 तास 9 मिनिटांचा चित्रपट फॅण्टसी-हॉरर-कॉमेडी ड्रामा असून सध्या आपल्या अनोख्या संकल्पनेमुळे आणि उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ओटीटीवर खूपच पसंत केला जात आहे. सध्या या साऊथच्या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. Zee5 वरील मस्ट वॉच चित्रपटांमध्ये याचा समावेश आहे.
advertisement
काय आहे 'हाउसमेट्स'?
'हाउसमेट्स' या चित्रपटात आर्शा चांदनी बैजू, काली वेंकट, दर्शन, विनोदिनी वैद्यनाथन आणि मास्टर हेनरिक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा कार्तिक (दर्शन) आणि अनु (आर्शा चांदनी बैजू) यांच्या भोवती फिरते. ते नव्या अपार्टमेंटमध्ये राहायला येतात. सुरुवातीला त्यांना काही विचित्र घटनांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांना वाटतं की घरात भूत आहे. पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा ते केवळ भीतीदायक नसून अत्यंत धक्कादायक ठरतं. या चित्रपटात केवळ हॉरर आणि कॉमेडी नाही, तर थोडी साय-फायची झलक देखील पाहायला मिळते.
advertisement
ओटीटीवर कुठे पाहाल?
भूताटकिच्या त्याच-त्याच कथा ऐकून कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन मनोरंजक पाहण्याच्या शोधात असाल, तर ‘हाउसमेट्स’ हा चित्रपट नक्कीच पाहा. या चित्रपटाचं सिनेपरिक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं आहे. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे. IMDb ने या चित्रपटाला 8 रेटिंग दिली आहे. यंदाच्या वर्षातील टॉप रेटेड मूव्हीजपैकी हा एक आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zee5 वर मस्ट वॉच आहे 'ही' 2 तास 9 मिनिटांची फिल्म, OTT वर गाजतेय साऊथची हॉरर कॉमेडी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement