TRENDING:

OTT Release: अ‍ॅक्शन, थ्रिलर, हॉरर... OTT वर 'या' आठवड्यात मोठा धमाका! 'हे' मूव्ही-सीरीज होणार रिलीज

Last Updated:

OTT Release: प्रत्येक आठवड्याप्रमाणे, या आठवड्यातही ओटीटी प्रेक्षकांसाठी मोठी ट्रीट घेऊन आलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक आठवड्याप्रमाणे, या आठवड्यातही ओटीटी प्रेक्षकांसाठी मोठी ट्रीट घेऊन आलाय. अ‍ॅक्शनने भरलेले चित्रपट, गुन्हेगारीवर आधारित थरारक सीरीज, हृदयस्पर्शी रोमान्स आणि अंगावर काटा आणणाऱ्या हॉरर स्टोरीज. सगळं काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रेक्षकांनी फक्त तारीख लक्षात ठेवायची आणि पॉपकॉर्नसह तयार बसायचं.
OTT वर 'या' आठवड्यात मोठा धमाका!
OTT वर 'या' आठवड्यात मोठा धमाका!
advertisement

या आठवड्यात काय काय पाहायला मिळणार ते पाहूया:

प्ले डर्टी (Prime Video, 1 ऑक्टोबर)

मार्क वाहलबर्ग आणि लाकीथ स्टॅनफिल्डच्या जोडीतील हा अ‍ॅक्शन थ्रिलर ‘सूड’ या विषयावर आधारित आहे. विश्वासघात झालेला नायक कसा गुन्हेगारीच्या दलदलीत उतरून प्रतिशोध घेतो, याची भन्नाट सफर यात दाखवली आहे.

'दारुच्या नशेत मला जबरदस्ती KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप

advertisement

मद्रासी (Prime Video, 1 ऑक्टोबर)

शिवकार्तिकेयन आणि ए. आर. मुरुगदास या कॉम्बिनेशनची धमाल वेगळीच आहे. एक एनआयए ऑफिसर, गुप्त मिशन आणि तामिळनाडूतील शस्त्रास्त्रांचा काळाबाजार… यामध्ये मानसिक संघर्षाचा ट्विस्ट पाहायला मिळेल.

मॉन्स्टर: द एड गेन सिरीज (Jio Hotstar, 5 ऑक्टोबर)

रायन मर्फी आणि इयान ब्रेननचा हा भयानक क्राइम ड्रामा सीरिजचा तिसरा सीझन आहे. १९५०च्या दशकातील कुख्यात सिरीयल किलर एड गेनची रोंगटे उभे करणारी कहाणी यात उलगडली जाईल.

advertisement

द गेम यू नेव्हर प्ले अलोन (Netflix, 2 ऑक्टोबर)

एक महिला गेम डेव्हलपर, तिचं वाढतं यश, आणि अचानक सुरु होणारे घातक हल्ले – या मिस्ट्री थ्रिलरमध्ये प्रेक्षकांना प्रचंड टेन्शन आणि ट्विस्ट्स मिळणार आहेत.

13th सम लेसन आर नॉट टॉट इन क्लॉसरूम (SonyLiv, 11 ऑक्टोबर)

रोमँटिक ड्रामांच्या चाहत्यांसाठी खास! गगनदेव रेयर्स, परेश पाहुजा आणि प्रज्ञा मोथघरे यांची ही सीरिज प्रेम, नातेसंबंध आणि आयुष्य शिकवणाऱ्या धड्यांवर आधारित आहे.

advertisement

या आठवड्यात ओटीटीवर प्रत्येकासाठी काहीतरी आहे. अ‍ॅक्शनप्रेमींसाठी प्ले डर्टी आणि मद्रासी, हॉरर-क्राइम चाहत्यांसाठी मॉन्स्टर: द एड गेन सिरीज, थ्रिलर लव्हर्ससाठी द गेम यू नेव्हर प्ले अलोन आणि रोमँटिक ड्रामासाठी 13 वा.

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Release: अ‍ॅक्शन, थ्रिलर, हॉरर... OTT वर 'या' आठवड्यात मोठा धमाका! 'हे' मूव्ही-सीरीज होणार रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल