TRENDING:

OTT वर अचानक ट्रेंड करायला लागलाय 'हा' चित्रपट; 15 मिनिटांचा चक्रावणारा क्लायमॅक्स पाहाच

Last Updated:

Top Trending Movie on OTT : एकच चित्रपट दोन नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडीओ या दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकाच वेळी ट्रेंड करत आहे. 2400 टक्क्यांहून अधिक नफा कमावणारा हा चित्रपट 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

OTT Trending Movie : ओटीटीवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहणं सिनेप्रेमींना खूपच आवडतं. दररोज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही जुनं-नवं ट्रेंड होत असतं. आताही ओटीटीवर 3 वर्षांपूर्वीचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ट्रेंडिंगमध्ये आहे. 2 तास 27 मिनिटांचा हा चित्रपट तुमचंही डोकं फिरवून टाकेल. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली होती. संपूर्ण भारतातील थिएटरमध्ये फक्त याच चित्रपटाचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं. सर्व वयोगटांतील लोकांनी हा चित्रपट पाहिला. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी करण्यात आली होती. आता तीन वर्षानंतर आजही या चित्रपटाची तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे. जाणून घ्या ओटीटीवर टॉप ट्रेंडिंग (OTT Top Trending) असणारा हा कोणता चित्रपट आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

advertisement

तीन वर्षांपूर्वीचा चित्रपट होतोय ट्रेंड

रिलीज झाल्यानंतर तीन वर्षांनी जर एखादा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये असेल, तर नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या चित्रपटाबाबत बोललं जात आहे तो 2022 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं बजेट फक्त 16 कोटी रुपये होतं, पण वर्ल्डवाइड या चित्रपटाने 400 कोटींची कमाई करत इतिहास रचला होता.

advertisement

"शाहरुखने भारत सोडावा"; अभिनव कश्यप किंग खानवर का भडकला?

काय आहे कथानक?

एका जंगलापासून या चित्रपटाची गोष्ट सुरू होते. ज्यावर एक जमीनदार ताबा मिळवू इच्छितो. पण त्या जंगलाच्या जवळ राहणारे गावकरी त्याला असं करू देत नाहीत, कारण त्यांचं मत असतं की त्या जंगलात त्यांच्या देवतांचं वास्तव्य आहे आणि ते त्यांच्या देवांची जमीन कुणालाही बळकावू देणार नाहीत. यावरून मोठा वाद सुरू होतो आणि यात प्रशासनाची एन्ट्री होते. त्यामुळे चित्रपटाचा हिरो आणि पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकतात. पण चित्रपटाचा क्लायमॅक्स अंगावर शहारे आणणारा आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला अमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध असलेला 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट पाहावा लागेल. हा चित्रपट सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. हिंदीतही हा चित्रपट पाहायचा असेल, तर नेटफ्लिक्सवर सहज पाहू शकता.

advertisement

आयएमडीबीवर 8.2 रेटिंग

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'चा प्रीक्वल म्हणजेच 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. 'कांतारा' या बहुचर्चित चित्रपटाला आयएमडीबीकडून 8.2 रेटिंग मिळाले होते. सध्या ओटीटीवरील मस्ट वॉच चित्रपटांपैकी हा एक आहे.

advertisement

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या आठ दिवसांत भारतात या चित्रपटाने 334.94 कमाई केली आहे. तर जगभरात 20.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना याने मागे टाकलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पान सेंटरने पालटलं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT वर अचानक ट्रेंड करायला लागलाय 'हा' चित्रपट; 15 मिनिटांचा चक्रावणारा क्लायमॅक्स पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल