TRENDING:

ओटीटीवर येतेय 'ती' सीरिज; प्रत्येक एपिसोडच्या बजेटमध्ये बनतील 5 बॉलिवूड चित्रपट; तारीख आताच लिहून ठेवा

Last Updated:

OTT Web Series : 26 नोव्हेंबर 2025 रोजी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या एका वेबसीरिजच्या प्रत्येक एपिसोडचं बजेट जवळपास 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या वेबसीरिजचा प्रत्येक एपिसोड 90 ते 120 मिनिटांचा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Stranger Things : नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेंजर थिंग्स' या लोकप्रिय वेबसीरिजचा पाचवा आणि अंतिम सीझन यावर्षी तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे. या वेबसीरिजचं बजेट सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सीझन 5 चं प्रति एपिसोड बजेट 50-60 मिलियन डॉलर म्हणजेच 443 ते 532 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बजेटच्या बाबतीत ही सीरिज 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: रिंग्स ऑफ पावर'च्या आसपास आहे. या वेबसीरिजचं प्रती एपिसोड बजेट 58 मिलियन डॉलरच्या आसपास होतं. त्यामुळे हा सर्वात महागड्या वेब सीरिजमध्ये हिचा समावेश आहे. या सीझनचं संपूर्ण बजेट जवळपास 480 मिलियन डॉलर म्हणजेच 4261 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

advertisement

'स्ट्रेंजर थिंग्स' सीझन 4 चं बजेट 30 मिलियन डॉलर (266 कोटी रुपये) प्रती एपिसोड होतं. पण शेवटच्या सीझनचं बजेटसमोर हा आकडा कुठेच नाही. या सीझनमध्ये 8 एपिसोड असणार आहेत. यातील पहिले चार 26 नोव्हेंबर आणि पुढील तीन 25 डिसेंबर तर शेवटचा एपिसोड 31 डिसेंबरला रिलीज होणार आहे. प्रत्येक एपिसोडचा कालावधी 90 मिनिटांचा आहे. त्यामुळे ही एखाद्या चित्रपटाप्रमाणे भव्य आहे.

advertisement

Vidyadhar Joshi : 'मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं फुफ्फुस कमजोर'; असं का म्हणाले विद्याधर जोशी?

'स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5' कधी होणार रिलीज?

'स्ट्रेंजर थिंग्स'ने लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ निर्माण केली आहे. ओटीटीवरील या सीरिजची सर्वाधिक चर्चा झाली आहे. नेटफ्लिक्सच्या लोकप्रियतेत या सीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. 'गेम्स ऑफ थ्रोन्स' आणि 'स्टार वॉर्स' यांसारख्या सीरिजमध्ये या 'स्ट्रेंजर थिंग्स'चाही समावेश आहे. 'स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5'मध्ये मॅट डफर आणि रॉस डफर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच या सीरिजमध्ये विनोना रायडर, मिली बॉबी ब्राउन, डेविड हार्बर, फिन वुल्फहार्ड आणि गेटेन मताराज्जो मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या पाचव्या सीझनमध्ये एकूण 42 एपिसोड असतील. 'स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5'चा प्रीमियर 26 नोव्हेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.

advertisement

'स्ट्रेजर थिंग्स सीझन 5'चा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 2 मिनिट 46 सेकंदच्या या टीझरने सर्वांनाचं हादरवलं. प्रेक्षकांना फक्त थक्कच नव्हे तर हैराण करणाऱ्या गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव, या टिप्सने बनणार नाही तेलकट, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
ओटीटीवर येतेय 'ती' सीरिज; प्रत्येक एपिसोडच्या बजेटमध्ये बनतील 5 बॉलिवूड चित्रपट; तारीख आताच लिहून ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल