अभिनेते पंकज त्रिपाठी अस्सी घाटावरुन बोटीने जाऊन संपूर्ण श्रद्धेनं मध्य गंगेच्या पात्रात आपल्या आईच्या अस्थि विसर्जन केल्या. या क्षणी ते प्रतंड भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते.
( Jeetendra Video : पायरीवरून अडखळले अभिनेते जितेंद्र, क्षणात जमिनीवर पडले; शॉकिंग VIDEO )
धार्मिक अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर पंकज त्रिपाठी अस्सी घाटावर असलेल्या एका आश्रमात गेले. तिथे त्यांनी दान पुण्य करून आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. तिथे त्यांना ब्राम्हणांना जेवण, कपडे आणि दक्षिणा दिली. माझ्या आईने नेहमीच मला संस्कार आणि करुणेची धडे दिले असंही सांगितलं. आश्रमातील पंकज त्रिपाठी यांचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आलेत. या प्रसंगी पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, सहकारी उपस्थित होते. त्यांच्या कठीण काळात शांती आणि सांत्वनासाठी आलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले.
advertisement
पंकज त्रिपाठी यांच्या आईचं 2 नोव्हेंबर रोजी बिहारच्या गोपालगंज येथे निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. त्याआधी 2023 मध्ये पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं होतं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
