'बिग बॉस मराठी ६' चं तिकीट; रितेशची फटकेबाजी
पत्रकार परिषदेत जेव्हा रितेशला विचारण्यात आलं की, "बाहेर निवडणुकीचं तिकीट कोणाला मिळणार याची धाकधूक आहे, मग तुमच्या घरात एखाद्या राजकीय नेत्याला एन्ट्री मिळणार का?" यावर रितेशने आपल्या खास शैलीत गुगली टाकली.
advertisement
रितेश हसत म्हणाला, "ज्यांना बाहेर राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं नाही, त्यांना या बिग बॉसच्या घराचं तिकीट मिळूही शकतं आणि नाहीही. मला खरंच माहित नाही की आत नेमके कोण आहेत. पण एवढं नक्की की यंदाचा खेळ लय भारी होणार." रितेशच्या या उत्तरावर तिथे उपस्थित असलेल्या जान्हवी किल्लेकर हिनेही मजेत भन्नाट प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "राजकीय पक्षाचं तिकीट मिळवणं कदाचित सोपं असेल, पण बिग बॉसच्या घराचं तिकीट मिळवणं त्याहून कठीण आहे."
सागर कारंडेपासून दीपाली सय्यदपर्यंत; कोण आहेत शर्यतीत?
यंदाच्या पर्वात ग्लॅमरसोबतच विनोदाचा तडकाही जोरदार असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे यंदा घर गाजवायला सज्ज झाला आहे. त्याच्यासोबतच राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेल्या दीपाली सय्यद यांचं नावही आघाडीवर आहे. तसेच, नेहमीच आपल्या अभिनयाने हसवणारा अंशुमन विचारे देखील यंदा 'बिग बॉस'च्या घरात दिसण्याची शक्यता आहे. काही सोशल मीडिया स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर्सनाही यंदा 'स्वर्ग आणि नर्क' या थीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
