प्राजक्ताने तिच्या संगीत सोहळ्यात आपल्या आई-वडिलांसाठी खास नृत्य सादर केले आणि तो क्षण इतका हृदयस्पर्शी होता की, स्टेजवर प्राजक्ता स्वतःही ढसाढसा रडली, तर तिच्या पालकांनाही अश्रू अनावर झाले!
आई-वडिलांसाठी प्राजक्ताचा हृदयस्पर्शी परफॉर्मन्स
लग्नाच्या आदल्या दिवशी, १ डिसेंबर रोजी, प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या संगीत सोहळ्याला मोठा उत्साह होता. या उत्साहात प्राजक्ताने आपल्या आई-वडिलांना एक अनमोल भेट दिली. लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतो. प्राजक्ताने तिच्या संगीत सोहळ्यामध्ये आपल्या आई-वडिलांसाठी "सच है कि भगवान है" आणि "धागों से बांधा" या गाण्यांवर नृत्य सादर केले. तिच्या या नृत्यात फक्त स्टेप्स नव्हत्या, तर आई-वडिलांप्रतीचे तिचे प्रेम आणि भावना ओतल्या होत्या.
advertisement
डान्स करताना प्राजक्ता खूप भावूक झाली आणि तिला स्टेजवरच रडू कोसळले. लाडक्या लेकीचे हे प्रेम पाहून तिच्या आईलाही आपले अश्रू रोखता आले नाहीत. हा बाप-लेकीचा आणि आई-मुलीचा भावनिक क्षण पाहून उपस्थित सगळेच भावूक झाले.
लाडक्या सुनेसाठी सासूबाईंचा स्पेशल डान्स
या संगीत सोहळ्यात खुटवड कुटुंबानेही प्राजक्तावर प्रेमाचा वर्षाव केला. प्राजक्ताच्या सासूबाईंनी यावेळी लाडक्या सुनेसाठी खास नृत्य सादर केले, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांतील संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसले.
संगीत सोहळ्यासाठी प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे, तिने आपल्या आईसोबतही त्याच रंगाचे कपडे घालून 'ट्विनिंग' केले होते, ज्यामुळे त्यांचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.
राजकीय आणि कलाविश्वातील मान्यवरांची हजेरी
प्राजक्ता-शंभुराजच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, रमेश परदेशी, हार्दिक जोशी यांसारख्या कलाकारांनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
'स्वराज्यरक्षक संभाजी' व्यतिरिक्त तिने 'आई माझी काळूबाई' या मालिकांमध्ये आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्मार्ट सुनबाई' सिनेमातही काम केले आहे.
