Health Tips : हिवाळ्यात तुमचे हात-पाय सुजतात का? नेमकी कोणती घ्यावी काळजी, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. या दिवसांत अनेकांची तक्रार असते की शरीरावर सूज येते, अंगदुखी जाणवते.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात तुमचे हात-पाय सुजतात का? तर जाणून घ्या डॉक्टरचा महत्त्वपूर्ण सल्ला 

पुणे: ‎महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. या दिवसांत अनेकांची तक्रार असते की शरीरावर सूज येते, अंगदुखी जाणवते. यामागचे कारण म्हणजे याकाळात थंड वाऱ्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या भागात रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे त्वचा लालसर होणे, सूज येणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी अनेक जण घरगुती उपाय म्हणून आग, चूल किंवा हीटरला हात-पाय सरळ लावून उष्णता देण्याचा प्रयत्न करतात पण हे उपाय शरीराला हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी सांगितले की, हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे संधिवाताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे घरात असतानाही पाय उबदार ठेवण्यासाठी चप्पल आणि सॉक्स वापरणे महत्त्वाचे आहे. या काळात शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच आंबट आणि जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, यासोबतच हलका व्यायाम, स्ट्रेचिंग आणि सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
advertisement
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पोषक आहार घेणे, फळे आणि भाज्या पुरेसे खाणे आवश्यक आहे. तसेच जास्त त्रास जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात तुमचे हात-पाय सुजतात का? नेमकी कोणती घ्यावी काळजी, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement