जगातील सर्वात महागडी सिगरेट कुठे मिळते? कोणत्या देशात लागतो सर्वात जास्त Tax?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तर अशी शिफारस केली आहे की, कोणत्याही तंबाखू उत्पादनाच्या एकूण किमतीच्या किमान 75% हिस्सा हा कर (Tax) असला पाहिजे.
मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांपैकी सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम म्हणजे उत्पादनांवर प्रचंड कर लावणे. सिगारेटवरील टॅक्स इतका वाढवला जातो की, ती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाते आणि आपोआपच लोक धूम्रपान करणे कमी करतात, सरकारने हे केल्यानंतर देखील अजूनही असे बरेच लोक आहेत, जे ते विकत घेतातच.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तर अशी शिफारस केली आहे की, कोणत्याही तंबाखू उत्पादनाच्या एकूण किमतीच्या किमान 75% हिस्सा हा कर (Tax) असला पाहिजे. भारत सरकार देखील जीएसटी (GST) आणि सेस (Cess) वाढवून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, तरीही अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारतातील किमती अजूनही खूप कमी आहेत.
advertisement
भारतात सुमारे 27 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात, त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या तंबाखू ग्राहक देशांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर, जगात सिगारेटच्या किमतीत किती तफावत आहे आणि कुठे धूम्रपानावर सर्वाधिक खर्च करावा लागतो, हे जाणून घेणे रंजक ठरेल.
पण जगातील सर्वात महागडी सिगारेट कुठे मिळते? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. तुम्हाला त्याचं उत्तर माहितीय?
advertisement
याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया (Australia). वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (World of Statistics) अहवालानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये सिगारेटचा एक साधा पॅकेट (20 सिगारेट) $27 डॉलरपेक्षा जास्त किमतीला विकला जातो. भारतीय चलनात ही किंमत सुमारे ₹2,245 च्या आसपास आहे.
कारण: ऑस्ट्रेलिया सरकारने धूम्रपान कमी करण्यासाठी कर इतका प्रचंड वाढवला आहे की, तेथे सिगारेट घेणे हा खूप मोठा खर्च ठरतो. 2030 पर्यंत धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियानंतर या यादीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे किमती थोड्या कमी असल्या तरी जगातील महागड्या सिगारेट विकल्या जातात.
युरोप, आशिया आणि अमेरिकेतील दर
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच युरोप आणि इतर आशियाई देशांमध्येही सिगारेटचे दर गगनाला भिडले आहेत:
युरोप: आयर्लंड (Ireland) आणि ब्रिटन (UK) सारख्या देशांमध्ये सिगारेटचे पॅकेट सुमारे $16 च्या आसपास मिळते. नॉर्वे, कॅनडा, फ्रान्स आणि फिनलंडमध्येही दर जास्त आहेत.
advertisement
अमेरिका: अमेरिकेत सिगारेटच्या पॅकेटसाठी सरासरी $९ खर्च करावे लागतात (किंमत राज्यानुसार बदलते).
भारत (तुलना): भारतात मार्लबोरो सिगारेटचे एक पॅकेट सुमारे $4 (सुमारे ₹350) मध्ये उपलब्ध होते. या दरामुळे सिगारेटच्या किमतीच्या जागतिक क्रमवारीत भारत 53 व्या स्थानावर आहे.
सर्वात कमी किमतीची सिगारेट कुठे मिळते?
जगात व्हिएतनाम (Vietnam) मध्ये सिगारेट सर्वात स्वस्त आहे. येथे सिगारेटचे पॅकेट फक्त $1.27 (सुमारे ₹105) मध्ये मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे तेथे तंबाखूवर लावलेला कमी कर.
advertisement
टॅक्स सर्वाधिक कुठे?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलिया जिथे किंमत सर्वाधिक आहे, तो देश कर लावण्याच्या बाबतीत जगात पहिल्या दहामध्ये येत नाही! सन 2025 च्या आकडेवारीनुसार, बोस्निया, इस्रायल आणि स्लोव्हाकिया यांसारख्या देशांमध्ये सिगारेटच्या किमतीतील 85% हून अधिक हिस्सा हा केवळ टॅक्स असतो. याशिवाय बल्गेरिया, पोलंड आणि तुर्किए येथेही उच्च कर लावले जातात.
advertisement
भारतात सिगारेटवर एकूण कर 52.7.७% पर्यंत पोहोचतो, जो WHO च्या शिफारशीपेक्षा (75%) खूप कमी आहे. त्यामुळे सिगारेटच्या किमतीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:57 PM IST


