डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी सांगितले की, हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे संधिवाताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे घरात असतानाही पाय उबदार ठेवण्यासाठी चप्पल आणि सॉक्स वापरणे महत्त्वाचे आहे. या काळात शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच आंबट आणि जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, यासोबतच हलका व्यायाम, स्ट्रेचिंग आणि सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
advertisement
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पोषक आहार घेणे, फळे आणि भाज्या पुरेसे खाणे आवश्यक आहे. तसेच जास्त त्रास जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 9:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात तुमचे हात-पाय सुजतात का? नेमकी कोणती घ्यावी काळजी, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला





