अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं साडी नेसली आहे. साडी नेसून ती एका कारच्या पुढ्यात उभी आहे. ही कार साधी सुधी कार नाहीये. ही कार एका जिल्हाधिकाऱ्याची आहे. डोळ्याला गॉगल अन् साधी साडी नेसून कारच्या बोनेट हात ठेवून प्राजक्तानं हा फोटो क्लिक केला आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या कारवर भारताचा झेंडा लावलेला आणि कारवर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी MH 14 DX 8081 असं लिहिलं आहे.
advertisement
( आधी मुंबईत आलिशान घर, आता मधुराणीनं घरी आणली महागडी कार; किंमत ऐकून व्हाल अवाक )
प्राजक्ताचा हा फोटो पाहून प्राजक्ता जिल्हाधिकारी झाली की काय असं तिच्या अनेक चाहत्यांना वाटलं. पण प्राजक्ताने शेअर केलेला हा फोटो खरा नसून तिच्या आगामी सिनेमातील आहे. प्राजक्ताने तिच्या फोटो कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला आहे.
न्यू फिल्म... Batch No 22 असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा फोटो शेअर केला आहे. Batch No 22 असं प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. आता या सिनेमात ती कोणत्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनंतर ती फार मोठ्या सिनेमा किंवा मालिकेत दिसली नाही. तिचे काही आगामी सिनेमे पाइप लाइनमध्ये आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे साडींमधील कमाल फोटोशूट ती शेअर करत असते.