राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहेरे म्हणतेय,"मी कोणत्याही देवीच्या मंदिरात दर्शनाला जाते तेव्हा मला ती आईच वाटते. एक किस्सा मला आवर्जुन शेअर करायचा आहे की, मी सातवी-आठवीत असताना आमच्या शाळेची गुजरातच्या चामुंडा माता मंदिरात एक सहल गेली होती. सहल आम्ही छान एन्जॉय करत असताना मला मासिक पाळी आली. मासिक पाळी येण्याची आयुष्यातली ती दुसरी की तिसरी वेळ होती. पाळी आल्याने मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, असं सर्व म्हणू लागले. मुलांना कसं सांगायचं, मी दर्शन नाही घेतलं तर सगळ्यांना कळणार याची मला त्यावेळी लाज वाटत होती. नंतर मी सोबतच्या मैत्रीणीला सांगितलं की सोड मला काही फरक पडत नाही..मी देवीच्या दर्शनाला जाणार आणि मी गेले. हे चांगलं आहे वाईट आहे मला माहिती नाही. पण त्यावेळी मला जे वाटलं ते मी केलं".
advertisement
बिग बॉस गाजवणाऱ्या फेमस डान्सरवर दु:खाचा डोंगर, एकटी पडली; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
प्रार्थना पुढे म्हणतेय,"मी देवीला म्हटलेलं, देवी तू माझ्यासाठी माझी आई आहेस आणि तू पण एक नारी आहेस. तुला माहिती आहे हे दु:ख काय आहे? चुकलं असेल तर सॉरी...मला माहिती आहे की तू मला माफ करशील. त्यामुळे कोणत्याही देवीच्या दर्शनाला जाते तर मला माझी आई आणि आता सासूबाईदेखील दिसतात".
प्रार्थनाच्या 'मर्दिनी'ची प्रेक्षकांना उत्सुकता!
प्रार्थना बेहेरे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यासह रुपेरी पडदादेखील ती गाजवत असते. पवित्र रिश्ता, माझी तुझी रेशीमगाठ या तिच्या लोकप्रिय मालिका आहेत. प्रार्थनाचा आगामी मर्दिनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.