बिग बॉस गाजवणाऱ्या फेमस डान्सरवर दु:खाचा डोंगर, एकटी पडली; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:

डान्सर सपना चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सपना आणि तिचे कुटुंबीय दु:खात आहेत.

News18
News18
सर्वत्र नवरात्र आणि विजयादशमीचा उत्साह आहे. या उत्साहाच्या वातावरणात बिग बॉस गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध डान्सर आणि गायिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. अभिनेत्री एकटी पडली असून संपूर्ण कुटुंब तिच्याबरोबर आहे. या अभिनेत्रीनं बिग बॉस 11मध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्ये तिने धम्माल उडवून दिली होती.
हरियाणवी डान्सर आणि बिग बॉस 11मधून फेमस झालेल्या सपना चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सपनाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.  सपना चौधरीचे कुटुंब आणि तिचे कुटुंब खूप दुःखात आहे. सपना चौधरी सध्या खूप कठीण काळातून जात आहे. सपनाची आई नीलम चौधरी यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सपनाची आई अनेक दिवसांपासून आजारी असल्याचं कळतंय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होतं पण त्यांना वाचवता आलं नाही.
advertisement
सपना चौधरीचे तिच्या आईशी खूप खास नातं होतं. तिने अनेकदा मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर तिच्या आईने अनेक कठीण सांगितल्या आहेत. कठीण काळात तिला तिच्या आईची खंबीर साथ मिळाली आहे.  तिच्या आईने तिच्या छोट्या स्टेज शोपासून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement

मृत्यूचे कारण

सपना चौधरीची आई नीलम चौधरी बऱ्याच काळापासून आजारी होती. त्यांनी 30 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नीलम चौधरी गेल्या काही काळापासून कावीळ आणि यकृताच्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्लाही दिला होता परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीलम चौधरी यांचे अंत्यसंस्कार 1ऑक्टोबर रोजी नजफगड येथे करण्यात आले. सपना चौधरी तिच्या पती आणि कुटुंबासह उपस्थित होती. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पूर्ण विधींनी अंत्यसंस्कार पार पडले.
advertisement
सपना चौधरीने अनेकदा तिच्या आईला तिची सर्वात मोठी शक्ती आणि प्रेरणा म्हणून वर्णन केले. स्टेज शोपासून ते राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्यापर्यंत, तिच्या आईने नेहमीच तिला पाठिंबा दिला. आईच्या आठवणीत सपना चौधरी अत्यंत दु:खी आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस गाजवणाऱ्या फेमस डान्सरवर दु:खाचा डोंगर, एकटी पडली; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement