कोण उठलंय मुनव्वर फारूकीच्या जीवावर? हत्येची दिली होती धमकी, वर्षभराने पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Last Updated:

Munawar Faruqui : मुन्नवरच्या जीवावर उठलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांची ओळख पटली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

News18
News18
मुंबई :  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिनेता सलमान खाननंतर अभिनेता कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. मध्यंतरी अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर देखील गोळीबार झाला. त्याचबरोबर   प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि बिग बॉसचा विजेता मुन्नवर फारूकी याला काही दिवसांआधी जीवे मारण्याची धमकी आली होती. मुन्नवरची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. यानंतर मुन्नवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान मुन्नवरच्या जीवावर उठलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 2024मध्ये मुन्नवरला धमकी देण्यात आली होती. जवळपास वर्षभरानंतर मुन्नवरच्या जीवावर उठलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस टीमने एक कट उधळून लावला आहे. कालिंदी कुंज परिसरात मध्यरात्री झालेल्या चकमकीत गँगस्टर रोहित गोदारा आणि वीरेंद्र चरण टोळीतील दोन शूटर जखमी अवस्थेत पकडले गेले. पोलीस सूत्रांनुसार, हे दोघे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी यांची हत्या करण्याचा कट रचत होते.
सूत्रांनुसार, अटक केलेल्या गुन्हेगारांची ओळख पटली आहे. राहुल हा पानिपतचा रहिवासी आहे आणि साहिल हा भिवानीचा रहिवासी आहे. हे शूटर डिसेंबर 2024 मध्ये हरियाणामध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडात वॉन्टेड होते आणि ते फरार होते. यावेळी त्यांचे नवे लक्ष्य मुनावर फारुकी होते. पोलिसांचा दावा आहे की, दोन्ही गुन्हेगारांनी मुनावरच्या हत्येची योजना आखली होती आणि मुंबई आणि बेंगळुरूमध्ये त्याच्या लपण्याच्या ठिकाणांची रेकीही केली होती.
advertisement
( Zubin Garg : झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, CID ने 2 आरोपींना केलं अटक; गायकाच्या हत्येचे गूढ उलगडणार?)
दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंसला काल रात्री माहिती मिळाली की, कुख्यात रोहित गोदरा-गोल्डी ब्रार-वीरेंद्र चरण टोळीतील शूटर्स दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये फिरत आहेत. पथकाने ताबडतोब कालिंदी कुंजमधील पुष्ता रोडवर सापळा रचला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, मोटारसायकलवरून आलेल्या दोन्ही संशयितांनी पोलिसांना पाहताच पळ काढला आणि गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्यांच्या पायात गोळ्या घालून त्यांना पकडले.
advertisement
advertisement
चकमकीत जखमी झालेल्या दोन्ही शूटर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुलासा केला की, ही टोळी परदेशात राहणारे रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार यांच्या इशाऱ्यावर काम करत होती. मुनावर फारुकी त्यांचे लक्ष्य होते. मुनावर फारुकी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे  गँगच्या रडारवर आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मुन्नवरच्या हत्येची सुपारी कोणी दिले आणि कटात आणखी कोण सामील आहे हे शोधण्यासाठी दोन्ही शूटर्सची चौकशी केली जात आहे.
advertisement
या चकमकीनंतर, मुनावर फारुकी यांच्या हत्येच्या प्रयत्नामागे कोणते शत्रुत्व होते आणि कोणाच्या इशाऱ्यावर ही गँग मुन्नवरला टार्गेट करत होती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
कोण उठलंय मुनव्वर फारूकीच्या जीवावर? हत्येची दिली होती धमकी, वर्षभराने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement