धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जगभरात डंका! IBDP च्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेला Education Advisers UK च्या IBDP जागतिक क्रमवारीत ९ वा क्रमांक मिळाला असून, टॉप-१० मध्ये स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय शाळा आहे.
धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेने (DAIS) आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एज्युकेशन ॲडव्हायझर्स यूके (Education Advisers UK) ने नुकत्याच जाहीर केलेल्या इंटरनॅशनल बॅकलॉरिएट डिप्लोमा प्रोग्राम (IBDP) निकाल २०२५ च्या जागतिक क्रमवारीनुसार, धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेला जगात 9 वा क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे, जागतिक टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय शाळा आहे.
सर्वाधिक विद्यार्थी असूनही जागतिक दर्जाची कामगिरी
या क्रमवारीत डीएआयएसला मिळालेले हे यश अधिक उल्लेखनीय आहे, कारण टॉप-10 मध्ये असलेल्या इतर शाळांच्या तुलनेत या शाळेत सर्वाधिक IBDP विद्यार्थी आहेत. याचा अर्थ, मोठ्या स्तरावर जागतिक दर्जाचे शैक्षणिक परिणाम देण्यात आणि त्याच वेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व समर्थन पुरवण्यात शाळेने यश मिळवले आहे. हे यश शाळा, येथील शिक्षक वर्ग आणि पालक समुदाय यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेचा मोठा सन्मान आहे, ज्यातून डीएआयएस शिक्षण क्षेत्रात जागतिक मापदंड म्हणून उभी राहिली आहे.
advertisement
22 वर्षांत जागतिक टॉप-10 मध्ये स्थान
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बोलताना, डीएआयएसच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या: “अवघ्या २२ वर्षांत डीएआयएसने जगभरातील IBDP शाळांमध्ये ९ वा क्रमांक मिळवला आणि ग्लोबल टॉप-१० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय शाळा ठरली, हे पाहून माझे मन अभिमानाने भरून आले आहे. हा सन्मान सर्वात आधी आमच्या विद्यार्थ्यांचा आहे, ज्यांची उत्सुकता आणि बांधिलकी रोज नवनवीन उच्चांक स्थापित करत आहे."
advertisement

त्या पुढे म्हणाल्या, "तसेच, आमच्या शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हे यश आहे, ज्यांचे मार्गदर्शन रोज उत्कृष्टतेची प्रेरणा देते. पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि समर्थनामुळेच आमचे ध्येय पूर्ण होत आहे. प्रत्येक मुलाला आत्मविश्वासी विद्यार्थी आणि दयाळू जागतिक नागरिक बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'शिकणे आनंददायी आणि शिकवणे सुखद' हे आमचे ध्येय आम्ही पुढेही कायम ठेवू."
advertisement
आंतरराष्ट्रीय शिक्षणात डीएआयएसचे नेतृत्व
हा जागतिक टप्पा आंतरराष्ट्रीय शिक्षणातील एक अग्रगण्य संस्था म्हणून डीएआयएसचे स्थान अधिक मजबूत करतो. तसेच, जगावर सकारात्मक प्रभाव पाडणारे आत्मविश्वासी विद्यार्थी आणि दयाळू नागरिक घडवण्याचे शाळेचे ध्येय या यशातून सिद्ध झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:01 AM IST