Diwali Decluttering : दिवाळी स्वच्छ्तेदरम्यान 'या' 8 वस्तू काढून टाका! आयुष्यावर करतात नकारात्मक परिणाम..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Diwali Home Cleaning : दिवाळीपूर्वी तुमचे घर स्वच्छ करताना आपण झाडून पुसून घरातील कचरा काढून टाकतो. साचलेला कचरा जागा व्यापतो आणि वाईट दिसतो. तसेच तो देवी लक्ष्मीच्या उपस्थितीत अडथळा आणतो असे मानले जाते. त्याचबरोबर अशा काही वस्तू असतात ज्या, खराब झाल्यानंतर घरात अजिबात ठेऊ नये. या दिवाळीत जुन्या आणि तुटलेल्या वस्तू काढून टाका आणि तुमचे घर आनंद आणि समृद्धीसाठी तयार करा.
advertisement
advertisement
advertisement
आपण दररोज वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कालांतराने खराब होतात. तरीही काही लोक भविष्यात वापरात येतील या आशेने त्या रद्दी म्हणून साठवून ठेवतात. मात्र त्यांची दुरुस्ती करणे अनेकदा महाग असते. म्हणून जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एकतर भंगार विक्रेत्याला विकल्या पाहिजेत किंवा सुरक्षितपणे विल्हेवाट लावल्या पाहिजेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement