Zubin Garg : झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, CID ने 2 आरोपींना केलं अटक; गायकाच्या हत्येचे गूढ उलगडणार?

Last Updated:

Zubin Garg murder case: वाहाटीतील लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात पोलिसांना मोठा धागा सापडला आहे.

झुबीन गर्गचा फोन जप्त
झुबीन गर्गचा फोन जप्त
मुंबई : वाहाटीतील लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात पोलिसांना मोठा धागा सापडला आहे. अनेक दिवस चाललेल्या तपासानंतर अखेर सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झुबिनचा हरवलेला मोबाईल फोन आणि काही महत्त्वाच्या वैयक्तिक वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांचा विश्वास आहे की या वस्तूंमध्येच सत्य लपलेले आहे आणि यामुळे प्रकरणातील अनेक गुढ उलगडू शकतात.
या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. श्यामकानू महंत: नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक, यांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. सिद्धार्थ शर्मा: झुबिन गर्गचे मॅनेजर, यांना गुजरात-राजस्थान सीमेवरून पकडण्यात आले.
दोघांनाही हातकड्या घालून कडक सुरक्षेत विमानाने आसाममध्ये आणण्यात आले आणि थेट सीजेएम न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
advertisement
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, झुबिनच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल फोन सिद्धार्थ शर्माकडे होता. हा फोन आणि इतर जप्त केलेल्या वस्तूंमध्ये चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांच्या मते, हे पुरावे संपूर्ण प्रकरणाला नवा मोड देऊ शकतात. सीआयडीने दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या 12 गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यात फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, कटकारस्थान अशा गंभीर आरोपांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, झुबिन गर्ग हे ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक होते. त्यांच्या अचानक आणि गूढ मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात धक्का बसला होता. आता या तपासातील नव्या घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि संताप अधिकच वाढला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zubin Garg : झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, CID ने 2 आरोपींना केलं अटक; गायकाच्या हत्येचे गूढ उलगडणार?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement