Shani Gochar: मोठा संघर्ष आता सुखात..! दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिचं नक्षत्र परिवर्तन; या राशींना लकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev Astrology: 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल. या दिवशी विविध देव-देवतांची पूजा केली जाते, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, दसऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनीचे नक्षत्र बदलेल. 3 ऑक्टोबर रोजी शनी गुरु ग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे 27 वर्षांनी शनी या नक्षत्रात प्रवेश करेल, हे नक्षत्र परिवर्तन खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्याप्रमाणे शनीचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे आहे, तसेच त्याचा नक्षत्र बदल देखील महत्त्वाचा आहे. शनिदेवाला कर्म फळदाता आणि न्याय देवता म्हणून ओळखलं जातं कारण तो एखाद्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनीचे नक्षत्र बदलते तेव्हा त्याचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना लाभ होईल जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2. मकर - दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणारा शनीचा नक्षत्र बदल मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रातही तो शुभ ठरेल. गुंतवलेल्या निधीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकतात, ज्यामुळे त्यांचा आदर वाढेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. जुने मतभेद दूर होतील. आरोग्यही सुधारेल.
advertisement
कुंभ - शनीचा हा बदल कुंभ राशीसाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. तुम्हाला मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी देखील दिली जाऊ शकते. आर्थिकदृष्ट्या, हा काळ गुंतवणूक आणि बचतीसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)