DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी, मोदी सरकाकडून मोठी घोषणा, दिवाळीचं गिफ्ट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
DA Hike Update: महागाई भत्त्यात वाढ होईल, याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला मोठे गिफ्ट मिळाले आहे.
DA Hike 8th Pay Commission: दसरा आणि दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने मोठे गिफ्ट दिलेले असून त्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू असेल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा महागाई भत्ता एकत्रित ऑक्टोबर महिन्याच्या पगारात मिळणार आहे.
महागाई भत्ता (DA) आणि DR हे पगार आणि पेन्शनचे महत्त्वाचे घटक आहेत. सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये या भत्त्यांमध्ये सुधारणा करत असल्याने, हे भत्ते सुधारित केले जातात. त्यामुळे सरकारी कर्मचारी जुलैपासून याची आतुरतेने वाट पाहत होते. आता, दिवाळीच्या काही दिवस आधी, सरकारने त्यांना ही भेट दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्यासंदर्भाने निर्णय घेतला गेला. वाढलेल्या ३ टक्क्यांच्या महागाई भत्त्याने ५५ टक्क्यांवरील महागाई भत्ता ५८ टक्के झाला आहे.
advertisement
जवळपास ६५ लाख पेन्शन धारकांना फायदा मिळेल
मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेल्या महागाई भत्त्याचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शन धारकांना फायदा मिळाले. पेन्शन धारक आणि केंद्रीय कर्मचारी दोन्ही महाभाई भत्त्याच्या प्रतीक्षेत होते.
आठव्या वेतनच्या शिफारसी कधी लागू होणार
आठव्या वेतनाच्या शिफारसी जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा आहे. याच मुद्द्यावर त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेटही घेतली आहे. यूनियनच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती अर्थमंत्री सीतारामन यांना केली आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
October 01, 2025 3:19 PM IST
मराठी बातम्या/देश/
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी, मोदी सरकाकडून मोठी घोषणा, दिवाळीचं गिफ्ट