TRENDING:

Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय; अर्ध्यातच थांबवलं 'देऊळ बंद 2'चं शूटिंग

Last Updated:

Pravin Tarde : अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यातच थांबवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Pravin Tarde : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अर्ध्यातच 'देऊळ बंद' या चित्रपटाचे शूटिंग थांबवले आहे. 'देऊळ बंद' चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. टीमकडून 11 लाख रुपये पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या काही मंडळींमार्फत शेतकरी आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी 'देऊळ बंद 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होणार होता. पण आता शूटिंग आणि या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान जास्तीत जास्त लोकांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. गरजू विद्यार्थांचं शिक्षण आणि त्यांची जेवणाची व्यवस्था या 11 लाखांमधून करण्यात येणार आहे.

advertisement

प्रवीण तरडे काय म्हणाले?

प्रवीण तरडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'देऊळ बंद 2' या चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी आणि प्रवीण तरडे म्हणत आहेत,"5 डिसेंबरला 'देऊळ बंद' हा चित्रपट रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाचं रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे. संपूर्ण टीमला घेऊन आता मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. तर निर्मात्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मदतदेखील जाहीर केली आहे. चित्रपटाच्या टीमकडून 11 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. यात विद्यार्थांचे शिक्षण, खाण्यापिण्याची व्यवस्था, मुंबई-पुण्यात शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च, अडचणीच्या काळात मुलांची शिक्षण सुरू राहतात पण मुलींची शिक्षण बंद होतात त्यासाठी 'देऊळ बंद 2'च्या टीमकडून खारीचा वाटा उचलला जाईल. कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची 'देऊळ बंद 2'च्या टीमकडून काळजी घेतली जाईल. 11 लाख रुपयांची मदत ब्रिजमोहन पाटील, शिवार हेल्पलाईन, न्यूज 18 लोकमतचे पत्रकार विलास बडे, सुबोध भावे यांच्या मार्फत ही मदत शेतकरी आणि गरजू विद्यार्थांना पोहचवणार".

advertisement

कुंडली नाही बायकोनं लग्नाआधी काढली सुपरस्टारची मेडिकल हिस्ट्री, करायला लावल्या 56 टेस्ट

प्रवीण तरडेंचं सर्वत्र कौतुक

प्रवीण तरडेंच्या व्हिडीओवर कळ आणि झळ अशीच मनात असावी लागते, शेतकऱ्यांना खत, औषधांसाठी मदत करा, आपण समाजाचं एक देणं लागतो, 'देऊळ बंद 2' लवकरात लवकर रिलीज करा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. प्रवीण तरडेंनी याआधीही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात म्हणत एक व्हिडीओ शेअर करत लोकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

advertisement

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहेत. सयाजी शिंदे, सुबोध भावे, संकर्षण कऱ्हाडे, अंकिता प्रभू वालावलकर, श्रेयस राजे अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. तसेच अभिनेता सोनू सूददेखील पूरग्रस्तांच्या मदतीला पंजाबमध्ये धावून गेला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीच्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडतेय? अशी घ्या योग्य काळजी, राहील तजेलदार
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय; अर्ध्यातच थांबवलं 'देऊळ बंद 2'चं शूटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल