कुंडली नाही बायकोनं लग्नाआधी काढली सुपरस्टारची मेडिकल हिस्ट्री, करायला लावल्या 56 टेस्ट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actor : प्रामुख्याने लग्नाआधी कुंडली जुळवली जाते. पण बॉलिवूड अभिनेत्याच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडलं. त्याच्या पत्नीने त्यांच्या कुंडलीऐवजी थेट मेडिकल हिस्ट्री काढून घेतली होती.
Akshay Kumar Twinkle Khanna : सामान्यपणे जेव्हा कोणी लग्न करतो, तेव्हा कुटुंबीय त्यांची कुंडली जुळवतात. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडले, की लगेच कुंडली जुळवण्याचा विषय येतो. पण बॉलिवूड सुपरस्टारच्या बाबतीत असं काहीच झालं नाही. त्याच्या होणाऱ्या पत्नीने त्याच्या कुंडलीऐवजी मेडिकल तपासण्या केल्या आणि तब्बल 56 टेस्ट्स करवून घेतल्या. सुपरस्टार अक्षय कुमारच्या त्याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने लग्नाआधी अक्षयची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री तपासली होती आणि त्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
ट्विंकलने काढली अक्षय कुमारची मेडिकल हिस्ट्री
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार दोघांनीही याविषयी पूर्वी खुलासा केला आहे की, ट्विंकलने लग्नाआधी अक्षयच्या 56 मेडिकल टेस्ट्स केल्या होत्या आणि अक्षयला त्याची कल्पनाही नव्हती. अलीकडे ट्विंकल आणि काजोलच्या शो 'Too Much with Kajol and Twinkle' मध्ये बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा सैफ अली खानसोबत पोहोचला होता, तिथेही त्याने या किस्स्याचा उल्लेख केला. अक्षयने सांगितले की, ट्विंकलने त्याचं संपूर्ण बॅकग्राउंड चेक केलं होतं. पण ते संपत्ती किंवा प्रसिद्धीबाबत नव्हतं, तर जेनेटिक्स आणि आरोग्याशी संबंधित होतं.
advertisement
अक्षयने केली ट्विंकलची पोलखोल
अक्षय म्हणाला की,“माणूस जेव्हा लग्न करतो तेव्हा दोन कुंडल्या जुळवल्या जातात. पण ट्विंकलला या सगळ्यावर विश्वास नव्हता. तुम्हाला माहित आहे तिने काय केलं? तिने हे तपासलं की माझ्या वडिलांना कोणती आजारपणं होती का? माझ्या मामा, काका, काकू यांच्याही जेनेटिक आणि डीएनए बॅकग्राउंडची माहिती घेतली. त्यानंतरच तिने ठरवलं की हां, आता याच्याशी लग्न करायला हरकत नाही.”
advertisement
ट्विंकलनेही केला होता खुलासा
ट्विंकल खन्ना 2016 मध्ये 'कॉफी विथ करण' या शोमध्येही याविषयी बोलली होती आणि यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. ट्विंकल म्हणालेली,“आपण लग्न करतो, बाळ होवू देतो, म्हणजे आपण आपल्या कुटुंबात एक नवीन जेनेटिक स्ट्रेन घेवून येतो. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं होतं की त्यांच्या कुटुंबात कोणाला कोणते आजार होते. त्याच्या काकांना कोणत्या वयात टक्कल पडलं? कंचन काकूचं निधन कोणत्या आजाराने झालं?”
advertisement
ट्विंकल आणि अक्षयचं लग्न
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार 2001 मध्ये लग्नबंधनात अडकले. या लग्नात दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांची पहिली भेट फिल्मफेअर मॅग्झिनच्या फोटोशूटदरम्यान झाली होती आणि या लग्नाआधी दोघांनी एक वर्षाहून अधिक काळ एकमेकांना डेट केलं होतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कुंडली नाही बायकोनं लग्नाआधी काढली सुपरस्टारची मेडिकल हिस्ट्री, करायला लावल्या 56 टेस्ट