प्रिया मराठेवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. प्रियाला अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी एकत्र आलीत. प्रियाचा ऑनस्क्रिन नवरा म्हणजे अभिजीत खांडकेकरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तुझेच मी गीत गात या मालिकेत प्रिया आणि अभिजीत खांडकेकर यांनी एकत्र काम केलं होतं. अभिजीत खांडकेकरनं प्रियाच्या ऑनस्क्रिन नवऱ्याची भूमिका साकारली होती. आरोग्याच्या कारणामुळे प्रियाने ही मालिका अर्धवट सोडली होती. प्रिया आणि अभिजीत यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 'तू भेटशी नव्याने' ही प्रियाची शेवटची मालिका ठरली.
advertisement
( तिचंही वय 38, तिलाही कॅन्सर; 14 वर्षांआधी प्रिया मराठेसारखीच अभिनेत्रीची चटका लावणारी एक्झिट )
प्रियाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर प्रियाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. प्रियाला अखेरचा निरोप देताना दोघांनाही अश्रू अनावर झाले.
अभिजीतचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो प्रचंड दु:खी आहे. त्याच्याबरोबर उभी असलेल्या आणखी एका सहकलाकाराला तो आधार देताना दिसत आहे. नेमकं काय करावं हे त्याला कळत नाहीये. प्रचंड अस्वस्थ अवस्थेत तो दिसत आहे.
व्हिडीओमध्ये अभिजीत खांडकेकरसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील दिसत आहे. मैत्रिणीच्या निधनाने प्रार्थना देखील दु:खात बुडाली आहे. प्रियाला अखेरचा निरोप देताना प्रार्थना अश्रू अनावर झालेत. प्रिया मराठेचं निधन हे सगळ्यांसाठी चटका लावणारं आहे.