अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने 14वर्षांआधी झालेल्या अभिनेत्री रसिका जोशीची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. नावाने नाही तर आपल्या अभिनयाने आणि बोलक्या चेहऱ्यामुळे रसिका जोशी नेहमीच ओळखली गेली. तिच्या दमदार अभिनयानं तिनं मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन विश्वात स्वत: वेगळी ओळख निर्माण केली होती. नायिका, खलनायिका, आई, सासू अशा विविधांगी भुमिकांनी रसिका जोशीनं मनोरंजन विश्वावर राज्य केलं.
advertisement
( Priya Marathe : 'प्रियाला भेटायला जायचं होतं पण...' शेवटची आठवण सांगत उषा नाडकर्णींना अश्रू अनावर )
अभिनेत्री रसिका जोशीचं 7 जुलै 2011 रोजी निधन झालं. रसिकाला ब्लड कॅन्सर झाला होता. जवळपास 3 वर्ष ती ब्लड कॅन्सरशी झुंज देत होती. कॅन्सरशी लढा देत असताना ती कामही करत होती. जुलै 2011 मध्ये व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 7 जुलै रोजी तिनं वांद्रे येथील रुग्णालयात निधन झालं.
रसिका जोशी आणि प्रिया मराठे या दोन्ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होत्या. दोघींनी त्यांच्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रसिका जोशी हिंदी मराठी अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत होती. तर अभिनेत्री प्रिया मराठे ही हिंदी आणि मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा होती. प्रिया प्रामुख्याने तिच्या खलनायिकी भुमिकांमुळे प्रसिद्ध होती. तुझेच मी गीत गात आहे ही प्रियाची शेवटची मराठी मालिका ठरली. या मालिकेतूनही तिनं आरोग्याच्या कारणामुळे अचानक एक्झिट घेतली होती.