प्रियाचा हसरा चेहरा, तिचा अभिनय आणि आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी चाहत्यांच्या मनात कायम राहील. आजारपणाने कितीही त्रास दिला तरी ती खचली नाही. उलट नाटकं, मालिका करत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिली.
2 वर्ष छोट्या पडद्यापासून दूर, अभिनयासोबत 'या' क्षेत्रात काम करत होती प्रिया मराठे!
2023 मध्ये ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मोनिका कामतच्या भूमिकेत दिसली होती. मात्र तब्येतीमुळे तिला ही मालिका मध्येच सोडावी लागली. त्यावेळी सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना स्वतःहून माहिती दिली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि प्रामाणिकपणा दिसून आला होता.
advertisement
प्रियाने मालिकेतूनच अभिनयाची सुरुवात केली. ‘या सुखांनो या’ ही तिची पहिली मालिका. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’मधून ती झळकली. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने नाव कमावलं. नायिकेच्या भूमिका कमी मिळाल्या, पण खलनायिका म्हणून प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. तिच्या प्रत्येक भूमिकेला एक वेगळं वजन असायचं. अभिनयासोबतच ती यशस्वी उद्योजिकाही होती. काही वर्षांपूर्वी तिने स्वतःचं कॅफे सुरू केलं होतं.
दरम्यान, प्रिया गेल्यानं मराठीसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. "नेहमी हसतमुख राहणारी प्रिया आता कायमची दूर गेली," असं म्हणत चाहते तिच्या आठवणीत भावूक झाले.