'कुत्रे आवडतात, पण...'
राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं आहे की, 'मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करतो. मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो, पण गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, फिरणारे कुत्रे समाजाची निष्काळजीपणा दर्शवतात, करुणा नाही.'
राहुलने सोशल मीडियावर दिखावा करणाऱ्या लोकांना एक जोरदार टोला लगावला आहे. तो म्हणाला, 'जर भटक्या कुत्र्यांवर इतकाच जीव असेल, तर कृपया त्यांना तुमच्या घरी घेऊन जा! फक्त सोशल मीडियावर मोठ्या स्टोरीज टाकून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करून वाद निर्माण करू नका.'
advertisement
'आई-वडिलांना कुत्र्याने चावा घेतला तर...?'
राहुलने या निर्णयावर टीका करणाऱ्यांना एक थेट प्रश्न विचारला आहे. तो म्हणाला, 'माझा शेवटचा प्रश्न: जर तुमच्या आई-वडिलांना किंवा मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला, तर तुमचा दृष्टिकोन असाच राहील का?'
राहुलने यासोबतच एक जुना अनुभवही सांगितला. २०२१ मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याने पाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला होता. राहुलने त्या जखमेचा फोटोही शेअर केला, पण त्या अभिनेत्याचं नाव मात्र सांगितलं नाही. त्याचा मुद्दा फक्त त्या लोकांबद्दल आहे, जे या निर्णयाच्या विरोधात जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ५ हजार कुत्र्यांसाठी निवारागृह तयार करण्याची सूचना केली आहे.