नरगिस आणि राज कपूर यांच्यातील जवळीक 'बरसात' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अधिक वाढली. नरगिसने राज कपूरच्या आर. के. स्टुडिओत आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. नरगिसच्या मैत्रिण नीलमने सांगितले होते की, राज कपूर नेहमीच नरगिसला म्हणायचे की ते तिच्याशी लग्न करतील. पण काळ जसा पुढे सरकरत गेला, तसतसं नरगिसला जाणवायला लागलं की राज कपूर आपल्या पत्नीला कधीच घटस्फोट देणार नाहीत. राज कपूरला घटस्फोट न देता लग्न कसे करता येईल, याचा कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी नरगिस तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे गेल्या होत्या. लेखिका मधु जैन यांनी त्यांच्या पुस्तकात, 'फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा: द कपूर्स'मध्ये लिहिले आहे की,"राज कपूर यांच्यासोबत लग्न करण्याची नरगिसची इच्छा इतकी तीव्र होती की तिने थेट तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे सल्ला मागितला की ती राज कपूरसोबत कायदेशीररित्या लग्न करू शकेल".
advertisement
Raj Kapoor Love Story: विवाहित राज कपूरच्या प्रेमात वेडी झालेली अभिनेत्री, लग्न करण्यासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा
राज कपूरही नरगिसशी लग्न करू इच्छित होते. पण त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांना हे मान्य नव्हते. अखेरीस नरगिसलाही हे लक्षात आले की राज कपूर कधीच तिच्याशी लग्न करणार नाहीत आणि त्यांनी राज कपूरच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नरगिसने कोणालाही न सांगता आर. के. फिल्म्सबाहेरची 'मदर इंडिया' ही फिल्म साइन केली तेव्हा राज कपूर यांना या गोष्टीची जाणीव झाली होती.
'या' कारणाने नगरिसने सोडला राज कपूरचा नाद
नरगिसने एकदा राज कपूरला त्यांच्या पत्नीला हार घालताना पाहिले होते आणि त्यानंतरच तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं. त्या दिवशी नरगिसने राज कपूरसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचे ठरवले होते. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही जेव्हा ते आले नाहीत, तेव्हा ती थेट त्यांच्या घरी पोहोचली. तेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा होत होता. राज कपूर आपल्या पत्नीला हार घालत होते. त्यानंतर नरगिस थेट तिथून बाहेर पडली.
अन् नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडल्या...
'मदर इंडिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडली आणि 1958 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे 'मदर इंडिया' या चित्रपटात सुनील दत्तने नगरिसच्या मुलाची भूमिका साकारली होती. नरगिसने लग्नानंतर चित्रपट करू नये, अशी सुनील दत्तची इच्छा होती. पतीच्या इच्छेचा आदर ठेवत नगरिस यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केलं. लग्नानंतर त्यांनी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला होता.