Raj Kapoor Love Story: विवाहित राज कपूरच्या प्रेमात वेडी झालेली अभिनेत्री, लग्न करण्यासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा

Last Updated:

Raj Kapoor Love Story: सिनेसृष्टीतील कलाकार अनेकदा सोबत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडूनही काहींची प्रेमकहाणी अधुरीच राहते.

विवाहित राज कपूरच्या प्रेमात वेडी झालेली अभिनेत्री
विवाहित राज कपूरच्या प्रेमात वेडी झालेली अभिनेत्री
मुंबई : सिनेसृष्टीतील कलाकार अनेकदा सोबत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडूनही काहींची प्रेमकहाणी अधुरीच राहते. असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबत झालं. राज कपूरच्या प्रेमात अभिनेत्री एवढी वेडी झाली पण तिला तिचं प्रेम मिळालं नाही.
1950-60 च्या दशकात एक सुंदर प्रेमकथा रंगली होती राज कपूर आणि नर्गिसची. नर्गिस राज कपूरवर इतकी प्रेम करत होती की ती त्याची दुसरी पत्नी होण्यासाठी कोणत्याही मर्यादा पार करायला तयार होती.

राज कपूर नर्गिस लव्हस्टोरी

राज कपूर यांचं लग्न लवकरच कृष्णा मल्होत्रा यांच्याशी झालं होतं. तरीही 'अंदाज'च्या सेटवर नर्गिस आणि राज यांचं प्रेम उमललं. तब्बल 16 वर्षं हे नातं चालू राहिलं. नर्गिसने घरच्या विरोधाला न जुमानता राज कपूरशी लग्न करण्याचा निश्चय केला होता.
advertisement
राज कपूर यांच्या प्रेमासाठी नर्गिसने थेट होम मिनिस्टरच्या दरवाजा ठोठावला. ती त्या काळच्या गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्यापर्यंत पोहोचली. केवळ पुन्हा लग्न करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून! पण कायदे, समाज आणि राज कपूरचा निर्णय तिच्या प्रेमापुढे अडथळा ठरले. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यास नकार दिला.
दरम्यान, शेवटी खचलेली नर्गिस आपल्या आयुष्यात पुढे गेली. तिने अभिनेता सुनील दत्तशी लग्न केलं. मात्र, नर्गिसचं लग्न झाल्याचं ऐकताच राज कपूरने स्वतःला सिगारेटने होरपळवलं. ही प्रेमकहाणी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील लव्ह स्टोरीजपैकी एक होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raj Kapoor Love Story: विवाहित राज कपूरच्या प्रेमात वेडी झालेली अभिनेत्री, लग्न करण्यासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement